गोवा

कॉमिक्स पुस्तकातून मुलांना मिळतात ‘कोरोना‘पासून बचावाचे धडे

Dainik Gomantak

पणजी,

कोरोना या संसर्गजन्य रोगाचा मुकाबला कसा करावयाचा, त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यावी, ही माहिती मुलांना जर त्यांच्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न जगभर होत आहे. आता देशातही तो प्रयोग अंमलात आणला जात आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे दोन इंग्रजीतून शालेय मुलांसाठी कॉमिक्स पुस्तके उपलब्ध केली आहेत, ती ऑनलाईन स्वरुपात मुलांना वाचता येणार आहेत, त्याशिवाय त्याचा आनंद लुटताही येणार आहे. 
शालेय मुलांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती करण्याच्यादृष्टीने कॉमिक्सचा वापर करण्यात आला आहे. या पुस्तकामध्ये कोरोनाचा उद्रेक आणि त्यापासून मुले कशी सुरक्षीत शकतात, याची माहिती दिली गेली आहे. चंदीगड येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ ऑफ मेडिकल एज्युकेशन रिसर्च अँड पंजाब विद्यापीठ (पीजीएमइआर) यांनी डिझाइन केलेले ‘किड्स, वायू आणि कोरोना' यात  ‘वायू‘ने सुपरहीरो म्हणून काम केले आहे. ज्याने मुलांना साथीच्या रोगाविषयी विषयी शिक्षित करण्याचे आवाहन केले आहे. 
या पुस्तकाचे लेखन पीजीएमइआरचे डॉ. रवींद्र खैवाल आणि पर्यावर्णीय अभ्यास विभागाचे प्रा. डॉ. सुमन मोर यांनी केले आहे. या पुस्तकाविषयी गोव्यात ‘गोवा कॅन'चे रोलॅण्ड मार्टिन यांनी केले आहे. ‘गोवा कॅन' ही संस्था टाळेबंदीच्या काळात विविध उपक्रम राबवित होती. त्याशिवाय तंबाखू आणि कोरोना विषाणूंविषयी विविध ठिकाणी जागृतीचे, तसेच मदतीचे गोवा कॅन ही संस्था काम करीत आहे. या जागरूकता अभियानाचे सध्याचे लक्ष दोन कॉमिक पुस्तके आहेत.

वायू हा सुपरहिरो.......
 'कोरोना व्हायरस फॉर किड्स - किड्स, वायू‘ आणि कोरोना: लढा कोण जिंकतो?‘ हे कोरोना-१९ वर आधारीत कॉमिक्स आहे. तर किड्स, वायु आणि कोरोना २ ः आम्ही साथीचा रोग नष्ट करू शकतो?‘ हे कोविड -१९ प्रतिबंदावर आधारित दुसरे कॉमिक्स आहे. अधिकाधिक शालेय मुलांमध्ये कॉमिक्सच्या माध्यमातून जागृती करण्याचे आणि कोरोनाविषयी त्यांच्यात घ्यावयाची दक्षतेची काळजी निर्माण करण्याचे काम यातून होत आहे. त्यामुळे ‘किड्स, वायू आणि कोरोना‘ यामध्ये ‘वायू‘ हा सुपरहिरो असून, तो मुलांना कोरोनाविरुद्ध कसा लढा द्यावयाचा हे धडे देत आहे, असे रोलॅण्ड मार्टिन' म्हणाले. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

Valpoi Old Bridge : सावर्डे जुना पूल होणार कालबाह्य : विश्वजीत राणे

PM Modi In Goa : जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू; गोव्यातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT