Shivani and His Father Dainik Gomantak
गोवा

Goa Accidental Death: 7 डिसेंबर राेजी गाेव्‍यात येऊन आम्‍ही आमची पुढील भूमिका स्‍पष्‍ट करू; शुभमसिंह चौहान

Goa Accidental Death: अनुराग राजावत याच्याविरुद्ध खुनाचा गुन्‍हा नोंद करावा

दैनिक गोमन्तक

Goa Accidental Death: नवेवाडे - वास्‍को येथे गॅस गळती होऊन मृत्‍यू आलेल्‍या शिवानी राजावत आणि त्यांची आई जयदेवी चौहान यांच्‍या मृत्‍यू प्रकरणात वास्‍को पोलिसांनी अनुराग राजावत या नौदल अधिकाऱ्याच्‍या विरोधात खुनाचा गुन्‍हा नोंद करावा, अशी तक्रार शिवानीचे वडील दिलीपसिंह चौहान हे ७ डिसेंबर रोजी वास्‍को पोलिसांना देणार आहेत, अशी माहिती त्‍यांचे पुत्र शुभमसिंह चौहान यांनी दिली.

शुभमसिंह हा मध्‍यप्रदेश पोलिसात अधिकारी असून आपल्‍या आईच्‍या मृत्‍यूनंतर तेरा दिवसांपर्यंत देवकृत्‍य चालू असल्‍याने सध्‍या आम्‍ही मध्‍यप्रदेशातच अडकून पडलो आहाेत. मात्र, ७ डिसेंबर रोजी आम्‍ही गोव्‍यात येणार आहोत आणि त्‍याच दिवशी आम्‍ही पोलिस आणि मुरगाव उपजिल्‍हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत,

अशी माहिती त्‍यांच्‍याशी संपर्क साधला असता दिली. 18 नाेव्‍हेंबर रोजी ही दुर्घटना घडली होती. गॅस चालू ठेवल्‍याने आगीने पेट घेऊन हा स्‍फाेट झाला हाेता. त्‍यात शिवानी व जयदेवी यांचा मृत्‍यू झाला हाेता. हा मृत्‍यू अपघाती नसून तो घातपात असल्‍याचा व आपल्‍या जावयानेच तो केल्याचा आरोप त्‍यांनी केला होता.

‘वृत्तपत्रे, समाजसेवी संघटनांचे आभार’

या प्रकरणात गोव्‍यातील वृत्तपत्रे, समाजसेवी संघटना आणि इतरांनी आपल्‍याला नैतिकदृष्‍ट्या तसेच कायदेशीरदृष्‍ट्या भरपूर मदत केली यासाठी आम्‍ही या सर्वांचे आभारी आहोत, असे शुभमसिंह याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्‍हटले आहे. 7 डिसेंबर राेजी गाेव्‍यात येऊन आम्‍ही आमची पुढील भूमिका स्‍पष्‍ट करू, असेही त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT