CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail: कोलवाळ कारागृह ‘स्वयंपूर्णते’च्या दिशेने

मुख्यमंत्र्यांचा पुढाकार : गोशाळेची उभारणी; महिला कैदी करणार सॅनिटरी पॅड्‌सची निर्मिती

गोमन्तक डिजिटल टीम

Colvale Jail कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाला स्वयंरोजगारात ‘स्वयंपूर्ण’ करण्याच्या अनुषंगाने तुरुंगातील कैद्यांसाठी या ठिकाणी संसाधन केंद्रे सुरू केली आहेत.

तसेच कारागृहातील कैद्यांना रोजगार व महिला कैद्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी येथे सॅनिटरी पॅड्‌स निर्मिती करणाऱ्या मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे.

कैद्यांना परत भविष्यात सर्वसामान्य आयुष्य जगता यावे यासाठी कौशल्य विकास माध्यमातून रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी कारागृहात उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. मंगळवारी (ता.२५) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या सर्व संसाधन केंद्रांचे उद्‌घाटन करण्यात आले.

कारागृहात गोशाळा उभारली असून येथील कैदी या गुरांची देखभाल करतील. या गोठ्यात सात गाई व एक बैल आहे. या गोठ्याच्या माध्यमातून भविष्यात गोबर गॅसची निर्मिती केली जाईल.

आधारकार्डचे वितरण

कोलवाळ कारागृहात कागदपत्रांच्या आधारे काही कैद्यांना यावेळी आधारकार्डचे वितरण करण्यात आले. तसेच हस्तकला केंद्र, चपाती बनविण्याचे मशीन उपलब्ध करून दिले.

कारागृहला पूर्णतः स्वयंपूर्ण बनविण्यासाठी हा उपक्रम असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हे सर्व उपक्रम सरकारी खर्चातून नव्हे तर सीएसआर कार्यक्रमांतर्गत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

व्यसन किंवा वाईट कृतीमुळे या कैद्यांकडून भूतकाळात चूक घडली असावी. परंतु समाजाने कैद्यांना त्याच नजरेतून पाहू नये.

या कैद्यांनी स्वतःमध्ये सुधारणा करण्याची तयारी ठेवली आहे. त्यामुळे आम्ही कैद्यांकडे सकारात्मक नजरेतून पाहिल्यास त्यांच्यात लवकर सुधारणा होण्यास मदत होईल.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Municipality: म्हापशातील नोकरभरतीत नियमांचे उल्लंघन! पालिकेतील पदोन्नतीवर प्रश्नचिन्ह, 11 कर्मचाऱ्यांची बढती वादाच्या भोऱ्यात

Goa Bison Attack: गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पाठीत शिंग खुपसले; स्थानिकांत भीतीचे वातावरण

June Lucky Zodiac Signs: व्यापाऱ्यांना बंपर नफा, तर नोकरदारांना प्रमोशन! जून महिन्यात 6 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पैशांचा होणार पाऊस

Goa Politics: गोवा फॉरवर्ड अजूनही काँग्रेस युतीचा घटक! आमची भूमिका निश्चितपणे मांडू- विजय सरदेसाई

RCB Fans Lathi Charge Video: आरसीबीचा विजय फॅन्सच्या अंगाशी! हुल्लडबाजी नडली, पोलिसांनी काठीनं चोप चोप चोपलं; पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT