Colvale Jail Suicide Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail: कोलवाळ कारागृहात धक्क्यांमागून धक्के, साहाय्यक तुरुंगाधिकाऱ्याच्‍या आत्‍महत्‍येने खळबळ

Colvale Jail Suicide: कोलवाळ येथील कारागृह अमली पदार्थ तस्करी आणि गुन्हेगारीचे केंद्रस्थान बनल्याचे स्पष्ट झाले असतानाच आता साहाय्यक तुरुंगाधिकारी रामनाथ गावडे (वय ५५, रा. सध्या तिस्क-उसगाव) यांच्या आत्महत्येने कारागृह प्रशासनाचे वाभाडे निघाले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी/म्हापसा: कोलवाळ येथील कारागृह अमली पदार्थ तस्करी आणि गुन्हेगारीचे केंद्रस्थान बनल्याचे स्पष्ट झाले असतानाच आता साहाय्यक तुरुंगाधिकारी रामनाथ गावडे (वय ५५, रा. सध्या तिस्क-उसगाव) यांच्या आत्महत्येने कारागृह प्रशासनाचे वाभाडे निघाले आहेत. लोकांमध्ये संतापाची लाट उसळली असून कारागृहाच्या कारभाराची न्यायालयीन चौकशी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

‘कारागृहात ड्रग्सचा पुरवठा आणि मोबाईलचा सर्रास वापर ही अत्यंत गंभीर बाब आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. चौकशी पूर्ण होऊन दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत कोलवाळ कारागृहातील हे रॅकेट पूर्णपणे मोडून काढणे कठीण आहे’, अशी संतप्त प्रतिक्रिया ॲड. महेश राणे यांनी व्यक्त केली.

मागील काही वर्षांत कारागृहातील बहुतांश कर्मचाऱ्यांच्या बदल्या करूनही कैद्यांतील मारामाऱ्या, अमली पदार्थांची प्रकरणे, मोबाईल सापडणे अशा घटना नित्याच्याच बनल्या आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीचा सरळमार्गी आणि कवी मनाच्या गावडे यांच्यावर मानसिक ताण आला असावा व त्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा सुरू आहे.

कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृह हे सुधारगृह आहे की चंबळचे खोरे, असा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारू लागले आहेत. साहाय्यक तुरुंगाधिकारी रामनाथ गावडे यांच्या आत्महत्येने अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवले आहेत. त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अधिकृत चौकशीतूनच स्पष्ट होईल; मात्र कारागृहातील बिघडलेल्या परिस्थितीबाबत समाजात आणि प्रशासनात गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

आत्महत्येमुळे सर्वांना धक्का!

मनमिळाऊ स्वभावाचे, अभ्यासू आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या रामनाथ गावडे यांनी आत्महत्या केल्याने सर्वत्र दुःखमिश्रित आश्चर्य व्यक्त होत आहे. गावडे कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्का असून, ते अद्याप या आघातातून सावरलेले नाहीत. सरकारने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

आत्महत्येची चौकशी व्हायलाच पाहिजे : ॲड. राजू मंगेशकर

कारागृहातील अमली पदार्थांचा व्यवहार हा सर्वश्रुत आहे. या प्रकरणात रामनाथ गावडे यांना गोवण्याचा किंवा बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न झाला आहे का, याची चौकशी व्हायला हवी. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने चौकशीचे आदेश देऊन सत्य समोर आणावे, अशी मागणी मंगेशी येथील कामगार नेते ॲड. राजू मंगेशकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT