Colva Beach Pollution Dainik Gomantak
गोवा

Colva Beach: कोलवा किनारा आपलं वैभव हरवून बसला... वाढत्या प्रदूषणाला सरकारच जबाबदार; समाज सेवक सायमन रॉड्रिग्ज यांची टिका

Colva Beach Pollution: एके काळी स्वच्छ, सुंदर व रुपेरी वाळूमुळे जगप्रसिद्ध झालेला कोलवा समुद्र किनारा आज आपले वैभव हरवू लागला आहे. आज या किनाऱ्याला प्रदूषणाचा विळखा पडला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: एके काळी स्वच्छ, सुंदर व रुपेरी वाळूमुळे जगप्रसिद्ध झालेला कोलवा समुद्र किनारा आज आपले वैभव हरवू लागला आहे. आज या किनाऱ्याला प्रदूषणाचा विळखा पडला आहे.

याबाबत येथील समाज सेवक सायमन रॉड्रिग्ज यांनी सांगितले की, कोलवा किनारा आता पूर्वीचा राहिलेला नाही. हा किनारा आज सर्व प्रकारच्या प्रदूषणाने दूषित झाला आहे. याचा त्रास स्थानिकांना भोगावा लागतो. याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. सरकारचे येथे कसलेही नियंत्रण राहिलेले नाही असे ते म्हणाले.

कोलवा समुद्र किनाऱ्यावर (Colva Beach) जाताना एक लहानशी खाडी पार करावी लागते. ही खाडी पार करण्यासाठी छोटा पूल उभारला आहे, मात्र या खाडीतील पाण्याचा रंग काळा झाला असून त्यावर हिरवा थर दिसत आहे. या पुलावरून जाताना लोकांना व पर्यटकांना दुर्गंधी सहन करावी लागते, असे रॉड्रिग्ज यांनी सांगितले. आठ दिवसांपूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकाऱ्यांनी इथे येऊन पाहणी केली आहे. मात्र त्यांना खाडीतील पाणी प्रदूषित का होते याचे कारण देता आले नाही. हे पाणी दुसरीकडे म्हणजे मलनिस्सारण पाइपलाइनमध्ये जोडण्याचा प्रयत्न दिसतो, असे रॉड्रिग्ज यांनी सांगितले.

किनाऱ्यावर जाताना विक्रेत्यांचा अडथळा

कोलवा किनाऱ्यावर जाण्यासाठी जो पूल आहे, त्या वाटेवर आइस्क्रीम, खाद्य पदार्थ विकणारे अनेक गाडे उभे झाले आहेत. त्यामुळे लोकांना व पर्यटकांना किनाऱ्यावर जाताना अडथळा निर्माण होतो, असे रॉड्रिग्ज यांनी सांगितले. आजवर कित्येक आमदार झाले, कोणालाही येथील स्थिती सुधारण्यास यश आलेले नाही. कोलवा हे जागतिक पर्यटन (Tourism) स्थळ असले तरी येथील स्थिती व वातावरण पाहिल्यास पर्यटक परत जाताना वाईट अनुभव घेऊनच जाण्याची शक्यता अधिक असल्याचे रॉड्रिग्ज म्हणाले.

भटके कुत्रे, गुरांचा त्रास

कोलवा समुद्र किनाऱ्यावर भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. त्यात भटक्या गुरांचीही भर पडली आहे. या गुरांचे मालक त्यांना समुद्र किनाऱ्यावर सोडून जातात. अजून जरी कोणती दुर्घटना घडली नसली तरी भविष्यात असे प्रकार घडले तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न रॉड्रिग्ज यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Formula 4 Racing In Goa: गोव्यात होणार प्रतिष्ठीत 'फॉर्म्युला- 4 रेस'; गोमंतकीयांना अनुभवता येणार जागतिक रेसिंग स्पर्धेचा थरार

टीसींना 'बॉडी कॅमेऱ्यांचे' कवच! खोट्या विनयभंगाचे आरोप रोखण्यासाठी होतेय मागणी, तिकीट नसताना टीसीशी हुज्जत घालणाऱ्या महिलेचा Video Viral

Goa Congress: 'भाजप का काँग्रेसविरोधात लढायचंय ठरवा'; भूमिका स्पष्ट करण्याचा माणिकराव ठाकरेंचा 'आप'ला सल्ला

Vaibhav Suryavanshi: LIVE सामन्यात वाद! आऊट दिल्यावर 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी अंपायरवर भडकला; पुढे काय झालं, पाहा VIDEO

Mohammed Siraj: "जा, रिक्षा चालव!", एका अपयशाने 'हिरो' ते 'झीरो'? मोहम्मद सिराजने नेटिझन्सच्या दुटप्पी भूमिकेवर सोडले मौन, म्हणाला...

SCROLL FOR NEXT