Colva Beach Beautification Dainik Gomantak
गोवा

धक्कादायक; कोलवा सौंदर्यीकरणाचे वाजले तीनतेरा

सज्जे वाहून गेलेः बालोद्यान भिंतीलाही तडे गेल्याने नागरिक संतप्त

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : मागच्याच आठवड्यात केलेल्या भाकिताप्रमाणे कोलवा समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात झालेल्या वाळूच्या धुपीने आपले प्रताप दाखवले आहेत. त्यामुळे कोलवा सर्किट योजनेखाली केलेल्या सौंदर्यीकरणाची वाताहात झाल्याचं चित्र आहे.

स्थानिक रहिवासी मात्र याप्रकरणी पर्यटन खात्याला दोष देत असून वेळीच सावध करूनही कोणतेच उपाय न योजल्याने या योजनेवर केलेला खर्च वाया गेल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. प्रसारमाध्यमांनी या आठवड्याच्या प्रारंभीच वाळूची मोठ्या प्रमाणात धूप होऊ लागलेली असून त्यामुळे तेथील काही उपक्रम समुद्रात जाण्याची शक्यता व्यक्त केली होती. पण यंत्रणेने ही बाब गांभिर्याने न घेतल्याने तसेच घडले आहे.

अगदी कोलवा किनाऱ्यावर पाण्यालगत उभा केलेला सज्जा पाण्यात कोसळला आहे तर दुसरा कोसळण्याच्या बेतात आहे. त्याचप्रमाणे तेथील बालोद्यानाकडेच्या भिंतीला समुद्र विस्तारामुळे तडे गेले आहेत. तसेच तेथील शोभिवंत दिव्यांची नासधूस झाली आहे. या भागातील रस्ताही काही प्रमाणात खचला आहे. त्यामुळे या योजनेवर केलेला खर्च वाया गेला आहे. संबंधितांनी स्थानिकांना विश्वासात न घेता ही योजना केल्याचा परिणाम असल्याचा ठपका लोकांनी ठेवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT