गोवा

Colonel CK Naidu Trophy: अझानच्या शतकचाच गोव्याला दिलासा, 380 धावांच्या आघाडीसह आंध्रने लादला फॉलोऑन

फॉलोऑननंतर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना गोव्याने तिसऱ्या दिवसअखेर १ बाद ६१ धावा केल्या.

किशोर पेटकर

Colonel CK Naidu Trophy: गोव्याच्या २३ वर्षांखालील क्रिकेट संघाने कर्नल सी. के. नायडू करंडक स्पर्धेतील आंध्रविरुद्धच्या लढतीत निराशाजनक खेळ केला, त्यामुळे त्यांच्यावर फॉलोऑनची नामुष्की ओढविली. या अपयशात केवळ सलामीच्या अझान थोटा याच्या शतकाचाच दिलासा लाभला.

कडापा येथील वायएस राजा रेड्डी आंध्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर मंगळवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आंध्रने पहिला डाव दुसऱ्या दिवसअखेरच्या ४ बाद ६०६ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर गोव्याचा पहिला डाव २२६ धावांची आघाडी प्राप्त केली.

फॉलोऑननंतर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना गोव्याने तिसऱ्या दिवसअखेर १ बाद ६१ धावा केल्या. ते अजून ३१९ धावांनी मागे असून बुधवारी सामन्याचा शेवटचा दिवस आहे. दिवसातील २.३ षटकांचा खेळ बाकी असताना पहिल्या डावातील शतकवीर अझान बाद झाल्यामुळे गोव्याला जबर धक्का बसला.

शानदार शतकी खेळी

गोव्याचा पहिला डाव संकटात असताना अझान थोटा याने किल्ला लढविताना शानदार शतक नोंदविले. त्याने ११६ धावा केल्या. या दरम्यान २१८ चेंडूंतील खेळीत ११ चौकार व २ षटकार मारले. संघाची ४ बाद ४५ अशी दयनीय स्थिती असताना या डावखुऱ्या फलंदाजाने जिगरबाज खेळ केला.

आयुष वेर्लेकर (२७) याच्यासमवेत त्याने पाचव्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. नंतर मनीष काकोडे (३३) याच्यासह आठव्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी करून ७ बाद १३७ वरून गोव्याला द्विशतक गाठून दिले. आंध्रच्या त्रिपूर्ण विजय याने ६ गडी बाद केले, तर अझानची महत्त्वपूर्ण विकेट मिळविलेल्या वासू याने तीन फलंदाज टिपले.

संक्षिप्त धावफलक

आंध्र, पहिला डाव: ४ बाद ६०६

गोवा, पहिला डाव: ७९.२ षटकांत सर्वबाद २२६ (अझान थोटा ११६, अभिनव तेजराणा ११, राहुल मेहता २, योगेश कवठणकर १, कौशल हट्टंगडी १, आयुष वेर्लेकर २७, शिवेंद्र भुजबळ ७, दीप कसवणकर ५, मनीष काकोडे ३३, लखमेश पावणे नाबाद ५, शुभम तारी ९, साकेत राम १-१४, वासू ३-८६, त्रिपूर्ण विजय ६-६३).

गोवा, दुसरा डाव (फॉलोऑननंतर): १९ षटकांत १ बाद ६१ (अझान थोटा ३५, अभिनव तेजराणा नाबाद १८, मनीष काकोडे नाबाद २, हेमंत रेड्डी १-१०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT