Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Land Conversion: जिल्हाधिकाऱ्यांना मिळणार जमीन रूपांतरण प्रकरणे 20 दिवसांनी निकाली काढण्याचा अधिकार

मसुदा अधिसूचना जारी; महसूल नियमात सुधारणा करण्याचा प्रस्ताव

गोमन्तक डिजिटल टीम

Goa land conversion: महसूल विभागातील जबाबदार अधिकारी जर एनओसी जारी करण्यात आणि शिफारसी सादर करण्यात विलंब लावत असतील, अथवा यात अयशस्वी होत असतील तर जमीन रूपांतरण प्रकरणासाठीच्या अर्जांवर आता जिल्हाधिकारी उपलब्ध माहितीच्या आधारे 21 दिवसात निर्णय घेणार आहेत.

त्यासाठी गोवा जमीन महसूल (जमिनीचा वापर आणि अकृषिक मूल्यमापन) नियम, 1969 मध्ये या परिणामासाठी सुधारणा करण्याचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे. दुरुस्तीसाठीचा मसुदा सार्वजनिक हरकती आणि सूचनांसाठी खुला आहे. त्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

नगर आणि देश नियोजन विभाग, वन विभाग, सर्वेक्षण आणि भूमी अभिलेख निरीक्षक आणि मामलतदार यांच्याकडून अहवाल/एनओसी/शिफारशी प्राप्त केले जातील. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर संदर्भ दिल्यानंतरच्या तारखेपासून हा अहवाल हे विभाग/अधिकारी 20 दिवसात सादर करतील.

जर 20 दिवसांत अहवाल सादर केला गेला नाही तर जिल्हाधिकारी या 20 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे रूपांतरणाच्या अर्जावर निर्णय घेतील, असे या दुरूस्ती मसुद्यात म्हटले आहे. या मसुद्याच्या नियमांवरील सर्व हरकती आणि/किंवा सूचना सचिव (महसूल), गोवा सरकार, महसूल विभाग, सचिवालय पर्वरी यांच्याकडे 15 दिवसांपूर्वी पाठवल्या जाऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: मंगळाचे पुष्य नक्षत्रात गोचर! 24 सप्टेंबरनंतर 'या' लोकांवर होणार धनाची बरसात; सकाळी 5:50ची वेळ ठरणार गेमचेंजर

8th Pay Commission Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी! 18000 मूळ वेतन असणाऱ्यांना मिळणार 68 हजारांपेक्षा जास्त बेसिक पे? फिटमेंट फॅक्टर बदलणार नशीब

150 वर्षांची परंपरा; तिसरी पिढीही मूर्तीकलेत व्यस्त, मोरजीतील पोके कुटुंबाची चित्रशाळा; पोर्तुगालमध्येही दिले शिल्पकलेचे धडे

इराणच्या हाती लागला मोठा 'जॅकपॉट'! सापडला 7.5 ट्रिलियन क्यूबिक फीट गॅसचा महाखजिना; नव्या हायड्रोकार्बन साठ्याने अमेरिकेचे दणाणले धाबे

Pre Primary Teachers Salary Hike: पगारवाढीच्या प्रतीक्षेत पूर्वप्राथमिक शिक्षिका, मुख्यमंत्र्यांकडे कैफियत; प्राथमिक शिक्षकांप्रमाणे वेतनवाढीची मागणी

SCROLL FOR NEXT