P. S. Sreedharan Pillai Governor of Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: ‘कावी’च्या समृद्धीसाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे; राज्यपाल पिल्लई

Goa Politics: वारसा जपण्‍याच्‍या हेतूने राजभवनावर कृतिसत्राचे आयोजन

दैनिक गोमन्तक

Goa Politics:

कावी कला ही गोव्याची ओळख आहे. कावी कलेच्या समृद्धीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. नव्या पिढीपर्यंत या कलेचा वारसा पोचावा यासाठी कृतिसत्रे आयोजित करून राजभवन त्यात आपले योगदान देईल, असे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी आज राजभवनाच्या नव्या दरबार सभागृहात नमूद केले.

यावेळी राज्यपालांच्‍या पत्नी के. रीटा, आमदार दिगंबर कामत, राज्यपालांचे सचिव एम. आर. एम. राव, विशेष अधिकारी आर. मिहीर वर्धन, इतिहास अभ्‍यासक संजीव सरदेसाई आणि कावी कलाकार सागर नाईक मुळे यावेळी उपस्थित होते.

राजभवनाने कावी कलेचा वारसा जपण्यासाठी आयोजित कृतिसत्राचे उद्‍घाटन केल्यानंतर ते म्हणाले, गोवा राज्याला लाभलेला एक अद्भुत वारसा आहे. चित्रकलेचे पारंपारिक तंत्र असलेल्या कावी कलेचा प्रसार हे कला वारशाच्या वैशिष्ट्यांपैकी एक आहे.

चार दिवसीय कावी कला कृतीसत्रातून ही कला संवर्धन करण्यासाठी मदतच होईल. कलेचे हे स्वरूप अतिशय अनोखे आहे. मंदिरे, चर्च आणि गोव्यातील काही वारसा घरांत कावीचा वापर दिसून येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमात या कलेला महत्त्व दिले आहे.

कामत म्हणाले, राज्यपाल हे जनतेचे राज्यपाल झाले आहेत. राज्यपालांनी इतरांसमोर एक आदर्श ठेवला आहे. राजभवन येथे अशा प्रकारची कार्यशाळा आयोजित करणे हा गोव्यातील कलाकारांसाठी मोठा सन्मान आहे.

राव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. वर्धन यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सरदेसाई आणि मुळे यांचीही भाषणे झाली. मेघा मुखर्जी यांनी सूत्रसंचालन केले. संदेश गडकरी यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT