Goa Winter Temperature Drop Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Updates 2024: गोमंतकीय गारठले! राज्यात पुन्हा थंडीचा जोर वाढला; पारा 19.4 अंशांवर

Goa Winter Temperature Drop: फेंगल चक्रीवादळाच्या परिणामामुळे पाऊस आणि उष्म्यात वाढ झाली होती; परंतु आता राज्यात पुन्हा थंडीचा जोर वाढला असून किमान तापमानाचा पारा १९.४ अंशावर गेला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News: राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर कमी झाला होता. फेंगल चक्रीवादळाच्या परिणामामुळे पाऊस आणि उष्म्यात वाढ झाली होती; परंतु आता राज्यात पुन्हा थंडीचा जोर वाढला असून किमान तापमानाचा पारा १९.४ अंशावर गेला आहे. यंदाच्या वर्षीचे हे आतापर्यंत नोंदविण्यात आलेले किमान तापमान असून, राज्यात २९ नोव्हेंबर रोजी १९.६ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली होती.

राज्यात पुढील चार-पाच दिवस वाढलेला थंडीचा कडाका कायम राहणार असून, पुढील पाच दिवस राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. पुढील ४८ तासांत राज्यातील तापमानाचा (Temperature) पारा कमाल ३४ तर किमान २० अंशांपर्यंत असण्याची शक्यता वर्तविली आहे. आज राज्यात कमाल ३४ अंश सेल्सिअस तर किमान १९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. आज मोठ्या प्रमाणात आर्द्रतेत घट झाली होती. ७७ टक्के इतक्या आर्द्रतेची नोंद करण्यात आली.

आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

राज्यात मागील दोन दिवसांपासून पुन्हा मोठ्या प्रमाणात थंडी पडायला सुरुवात झाल्याने थंडीपासून वाचण्यासाठी अनेक नागरिक (Citizens) स्वेटर, मफलर, लोकरीच्या टोपीचा वापर करत आहेत. राज्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नागरिक शेकोटी पेटवून बसलेले पाहायला मिळतात. थंडीपासून वाचण्यासाठी तसेच कोणत्याही आजाराला सामोरे जावे लागू नये, यासाठी नागरिक गरम पाणी पिणे तसेच इतर आरोग्याची काळजी घेत आहेत.

राज्यात तापमानाचा पारा घटला आहे. एकंदरीत राज्यात आता खऱ्या अर्थाने थंडीची चाहुल लागली असून पुढील काही दिवस थंडी कायम राहणार आहे. मात्र, किमान तापमान अजून खाली जाण्याची शक्यता तशी कमीच आहे.

- नहूष कुलकर्णी, संचालक गोवा वेधशाळा.

राज्यात मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा घटत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस थंडी कायम राहणार आहे. तसेच राज्यात यंदा हिवाळ्यात बऱ्यापैकी थंडी जाणवण्याची शक्यता आहे.

- डॉ. रमेशकुमार एम. आर.-शास्त्रज्ञ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT