Cm Pramod Sawant  
गोवा

Coastal Clean-up: गोव्यात किनारपट्टी स्वच्छता अभियानाला सुरूवात; राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री सहभागी

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात किनारपट्टी स्वच्छता अभियानाला (International Coastal Clean-up Day) सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस तसेच, अमृत महोत्सवानिमित्त या किनारपट्टी स्वच्छता अभियानाचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी मिरामार बीचवर उपस्थिती लावत स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. यावेळी भाजपप्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानवडे, राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी उपस्थिती लावली. राज्यपाल, मुख्यमंत्री यांनी यावेळी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला व उपस्थितांना संबोधित केले.

Governor Pillai

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 'ब्लु इकॉनॉमी'चा उल्लेख करत येणाऱ्या पिढीला स्वच्छ आणि सुंदर सागरी किनारे देण्याची आपली जबाबदारी असल्याचे नमूद केले. गोव्यातील 37 बीचवरती आज स्वच्छता केली जाणार आहे. गोव्यातील नागरिक आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनी किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असे सावंत यांनी यावेळी सांगितले.

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी कळंगुट येथे आयोजित स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. रोहन खंवटे म्हणाले, सागरी किनाऱ्यांची स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. सागर किनारी राहणारे लोक तसेच, जलचरांसाठी ही स्वच्छता गरजेची आहे. तसेच, सूर्य, रेती आणि सागर यासाठी आपले किनारे स्वच्छ आणि सुरक्षित आहेत का याची काळजी आपण घेतली पाहिजे.

Tourism Minister Rohan Khaunte

सागरी किनारे स्वच्छता मोहिम ही आंतरराष्ट्रीय मोहिम असून, भारत सरकराने गोव्यातील पाच बीच यासाठी निवडले आहेत. मिरामार, बायणा, कोलवा, बोगमाळो आणि वेळसाव (Bogmalo, Baina And Velsao) हे पाच बीच या स्वच्छता मोहिमेचे भाग आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT