CM Pramod Sawant At Pandharpur  Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant: पंढरपुरात गोमंतकीयासाठी भक्त निवास, सोलापूर प्रशासनाने द्यावी जागा; मुख्यमंत्र्यांची मागणी

Bhakt Niwas At Pandharpur By Goa Government: जागा उपलब्ध झाल्यानंतर गोवा सरकार सर्व सोयी सुविधांनी युक्त असे भक्तनिवास बांधेल

गोमन्तक डिजिटल टीम

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मनोभावे दर्शन घेतले. आळंदी येथून आलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शनही घेतले.

राज्याच्या विकासासाठी, लोकांना आनंदी, सुखी, समाधानी ठेव, अशी प्रार्थना त्यांनी केली. पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी गोवा राज्यातून लाखो भाविक दरवर्षी आषाढी कार्तिकीच्या निमित्ताने येतात. येथे येणाऱ्या गोव्यातील भाविकांसाठी आता गोवा सरकार भक्तनिवास बांधणार आहे.

यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतर गोवा सरकार त्या ठिकाणी सर्व सोयी सुविधांनी युक्त असे भक्तनिवास बांधेल. भाजपचे प्रदेश सरचिटणीस. नरेंद्र सावईकरही उपस्थित होते. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा सत्कार करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT