Cm Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant : हुर्डा पार्टीनंतर मुख्यमंत्री विठ्ठलाच्या दर्शनाला; विविध नेत्यांच्या भेटींमुळे चर्चा

आज कोल्हापूर दौरा

दैनिक गोमन्तक

Cm Pramod Sawant : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दोन दिवसांच्या सोलापूर-कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी सोलापूर दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांच्या गाठीभेठी घेतल्या. सायंकाळी त्यांनी पंढरपुरात विठ्ठल-रखुमाई मंदिराला भेट दिली.

डॉ. सावंत २३ रोजी सकाळी ९ वाजता सोलापूर विमानळावरून खासगी चार्टर विमानाने कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत. ते साडेनऊ वाजता कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर टेंबलाईवाडी, कणेरी मठ येथील सिध्देश्वर मंदिरात देवदर्शन करून ते कोल्हापूर विमानतळावरून गोव्याकडे प्रयाण करणार आहेत.

दरम्यान, सावंत यांनी सोलापुरात विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्याने चर्चेला उधाण आले. मुख्यमंत्री सावंत यांनी आज सोलापूर दौऱ्यात मालदंडी आणि बार्शी शाळूच्या हुरड्याचा आनंद घेतला. शेंगदाणा चटणी, जवस चटणी आणि सांगोल्याच्या प्रसिद्ध द्राक्षांचाही सावंत यांनी आस्वाद घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait Of Hormuz: '20 लाख डॉलर डॉलर्स द्या, सुरक्षित मार्ग मिळवा...' इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनीचा नकाशा प्रसिद्ध; व्यापारी जहाजांच्या मानेवर स्फोटकांची तलवार

VIDEO: विराटचं नाव आलं अन् बाबरचं डोकं फिरलं! किंग कोहलीच्या 'फिनिशिंग' स्टाईलवरुन पत्रकाराची गुगली; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

काय तो निर्णय अन् काय तो राग! भर मैदानात पडला रक्ताचा सडा, रनआऊटसाठी अंपायरची चाकू भोसकून हत्या; क्रिकेट टूर्नामेंटमध्ये थरार

8th Pay Commission: मोदी सरकारची केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट, मुलांच्या शिक्षणासाठी मिळणार बक्कळ पैसा; CEA चे नवीन नियम जाहीर

Iran US Ceasefire: पाकड्यांची 'इंटरनॅशनल' फजिती! कॉपी-पेस्ट मेसेजवरुन शाहबाज शरीफ ट्रोल; इराण-अमेरिका शस्त्रसंधीचं क्रेडिट घेण्याची धडपड

SCROLL FOR NEXT