Pramod Sawant Government Budget in Goa for 2022-23 Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज गोव्याचा अर्थसंकल्प सादर करणार

राज्याचा 2022-23 चा अर्थसंकल्प विधानसभेत मांडणार, पुढील अधिवेशनात चर्चा होणार

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात विधानसभा मंत्रिमडळाच्या सोमवारी झालेल्या शपथविधीनंतर आज बुधवारी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. रोजगार संधी, पर्यटन आणि साधन सुविधांची निर्मिती करणारा, खनिज उद्योग आणि कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देणारा राज्याचा 2022-23 चा अर्थसंकल्प बुधवारी विधानसभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे अर्थमंत्री या नात्याने सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पावर सध्या चर्चा केली जाणार नसून केवळ तो मांडला जाणार आहे. पुढील अधिवेशनात त्यावर चर्चा होऊन तो मंजूर केला जाणार आहे. (Goa Budget News 2022-23 News Updates)

मंगळवारपासून सुरु झालेल्या दोन दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज बुधवारी मुख्यमंत्री संपूर्ण वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Budget) सादर करतील. यापूर्वीच्या खर्चाच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी देण्यात येईल. या अधिवेशनात केवळ अर्थसंकल्प सादर केला जाणार असून पुढील अधिवेशनामध्ये यावर सविस्तर चर्चा होऊन हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात येईल. मात्र, तत्पूर्वीसाठी लागणाऱ्या खर्चाच्या मागण्यांना मंजुरी घ्यावी लागेल. पुढील वर्षभरात खनिज व्यवसाय सुरू करण्यासाठीचे प्रयत्न या अर्थसंकल्पामध्ये असतील. पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी साधन सुविधांच्या निर्मितीबरोबर प्रामुख्याने रोजगार निर्मितीसाठी सरकारचे विविध प्रयत्न राहतील असे संकेत आहेत

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार (Goa Government) सादर करीत असलेला हा अर्थसंकल्प राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देणारा बनवण्यासाठीचे प्रमोद सावंत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या सरकारसमोर महसुलाचे मोठे आव्हान आहे. यापुढील काळात जीएसटी (GST) परतावा मिळणार नसल्याचे संकेत यापूर्वीच केंद्र सरकारने दिल्याने राज्याला आपला महसूल वाढवावा लागणार आहे. तर खर्चांना कात्री लावावी लागणार आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प अनेक अर्थाने महत्त्वाचा असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

China Artificial Sun: चीन बनवणार 'आर्टिफिशियल सन'! सूर्यासारखी धगधगती ऊर्जा मुठीत; सुपरकंडक्टिंग मॅग्नेट टेस्ट यशस्वी

Youth Protest: भाजपची पोपटपंची चाललीच नाही! 'हिंदू-मुस्लिम'च्या सापळ्यात न अडकता तरुणाईचा व्यवस्थेविरुद्ध थेट एल्गार

Pakistan-Afghanistan Conflict: पाक-अफगाण सीमेवर रक्तपात! हवाई हल्ले अन् चकमकीत 500 अफगाण नागरिकांचा मृत्यू; युनायटेड नेशन्सचा धक्कादायक रिपोर्ट

Japan Earthquake: जपानमध्ये 7.1 तीव्रतेचा भूकंप! समुद्रात उसळल्या महाकाय लाटा; त्सुनामीच्या अलर्टने नागरिकांमध्ये घबराट VIDEO

Morjim CRZ Demolition: मोरजीतील भूमिपुत्रांच्या वेदना कायम! तेमवाड्यातील बांधकामांवर 6व्या दिवशीही हातोडा

SCROLL FOR NEXT