CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

आयआयटीसाठी लवकरच गोव्यात कायमस्वरूपी संकुल!

आयआयटी शिक्षणाचा उपयोग देश उभारणीसाठी व्हावा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं स्पष्टीकरण

दैनिक गोमन्तक

फोंडा : राज्यात आयआयटीला कायमस्वरुपी संकुल लवकरच उपलब्ध करून दिले जाईल. आयआयटी संकुल उभारण्यात अनेक अडचणी आल्या; पण आता कोणत्याही स्थितीत आयआयटीसाठी नवीन संकुल शक्य तेवढ्या लवकर उपलब्ध केले जाईल, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. फोंड्यातील राजीव गांधी कला मंदिरात शनिवारी आयआयटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला व्यासपीठावर आयआयटी गोवाचे प्रमुख बी. के. मिश्रा, खास निमंत्रित प्रा. देवांग खक्कर, उद्योजक नितीन कुंकळ्येकर तसेच आयआयटी गोवाचे प्रा. सचिन कोरे आदी उपस्थित होते. आयआयटी गोवामध्ये उत्तीर्ण झालेल्या विविध वर्गातील विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली.

रोजगार देणारे उद्योजक हवेत!

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, राज्यात पर्यटनदृष्ट्या समृद्ध समुद्र आणि निसर्ग उपयुक्त ठरला असून या क्षेत्रात अधिक चांगली सुविधा उपलब्ध करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाईल. उच्च शिक्षण घेतलेल्यांनी आपल्या माहितीचा उपयोग देश समृद्ध करण्यासाठी करावा. रोजगार मागणारे नव्हे तर रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक आयआयटीच्या माध्यमातून तयार व्हावेत, असे आवाहन त्यांनी केले.

प्रा. देवांग खक्कर यांनी आयआयटी विद्यार्थ्यांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी पहिले प्राधान्य द्यावे असे सांगताना तंत्रज्ञानाच्या कक्षा विस्तारत असताना नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी तयार रहावे असेही नमूद केले. गोव्यातील आयआयटी केंद्राची प्रगती उत्तम असून राज्य सरकारकडून मिळणाऱ्या सहकार्यामुळेच गोव्यात उच्च शैक्षणिक संधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कोविड काळात ‘आयआयटी’चा उपयोग
कोविड महामारीमुळे गेली दोन वर्षे वाया गेली. कोविड महामारीचा उद्रेक असताना फर्मागुढी येथील आयआयटीचा कॅम्पस कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आला. शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून एकप्रकारे सामाजिक कार्यच आयआयटी गोवा केंद्राने केले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद करून आयआयटी गोवाचे प्रमुख व इतरांचे अभिनंदन केले.

आयआयटी सांगेत...पण...!
वास्तविक आयआयटीसाठी सांगेत जागा निश्‍चिती झाली आहे, पण मुख्यमंत्र्यांनी सांगेचा उल्लेख करण्याचे टाळले. आयआयटीसाठी आतापर्यंत काणकोण व सत्तरीत विरोध झाला, पण सांगेत आता आयआयटी कॅम्पस उभारण्यासाठी कार्यवाही सुरू असून मुख्यमंत्री सावंत यांनी आयआयटीचा कॅम्पस लवकरच उपलब्ध करून दिला जाईल, पण तो कुठे हा उल्लेख टाळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

Sheikh Hasina Press Conference: 'मी जेल आणि मृत्यूला घाबरत नाही!', शेख हसीना यांचा मायदेशी परतण्याचा थेट इशारा; भारतातील पत्रकार परिषदेने उडवली खळबळ

SCROLL FOR NEXT