Chief Minister Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

रशियातून दिल्लीमार्गे गोव्यात आलेले प्रवासी Omicron संशयित: मुख्यमंत्री

आम्ही त्यांना थेट Omicron रुग्ण म्हणू शकत नाही. त्यांचे रिपोर्ट प्रलंबित असून, ते सर्व आयसोलेशनमध्ये आहेत. मी लोकांना जास्तीत जास्त लसीकरण करण्याचे आवाहन करतो.

दैनिक गोमन्तक

राज्यातील कोरोनाचा धोका कमी झाला नसताना दुसरीकडे कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने धुमाकुळ घालण्यास सुरुवात केली आहे. राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. 'यातच आता रशियातून दिल्लीमार्गे गोव्यात आलेले प्रवासी ओमिक्रॉन संशयित सापडले आहेत. दरम्यान, आम्ही त्यांना थेट Omicron रुग्ण म्हणू शकत नाही. त्यांचे रिपोर्ट प्रलंबित असून, ते सर्व आयसोलेशनमध्ये आहेत. मी लोकांना जास्तीत जास्त लसीकरण करण्याचे आवाहन करतो, असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरियंटचे राज्यात (Goa) 5 संशयित रुग्ण असले तरी कोरोनाविषयक स्थिती नियंत्रणात आहे. राज्यात सद्यस्थितीत लॉकडाऊनची गरज नाही. त्यामुळे लोकांनी घाबरण्याचे कारण नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी सांगितले होते. संबंधित संशयितांचे जीनोम सिक्वेलिंगचे अहवाल प्रतीक्षेत असून ते उद्या किंवा परवा येतील, असे आरोग्य खात्याच्या वतीने सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT