CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: उंडिर येथील एसटीपी प्रकल्प गरजेचा; स्थानिकांशी चर्चा करू

मुख्यमंत्र्यांची ग्वाही; प्रकल्प मागच्या सरकारने आणल्याची माहिती

Akshay Nirmale

CM Pramod Sawant Hello Goenkar Programme: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हॅलो गोंयकार या कार्यक्रमात एका कॉलरने फोनवरून उंडिर येथील एसटीपी प्रकल्पाबाबत प्रश्न उपस्थित केला. गेले काही दिवस हा प्रश्न चर्चेत आला आहे. त्याबाबत बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी हा प्रकल्प गरजेचा असून खूप काळापासून प्रलंबित असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, उंडिर येथील एसटीपी प्रकल्प हा मूळचा आमच्या आधीच्या सरकारने आणलेला प्रकल्प आहे. तथापि, तो प्रकल्प गरजेचा आहे. त्याच्या सर्व परवानग्या मंजूर झालेल्या आहेत. हा एक प्रलंबित प्रकल्प आहे. तो पूर्ण करणे गरजेचे आहे. किंबहुना तो गरजेचा आहे.

याबाबत काही अडचणी असतील तर त्याबाबत स्थानिकांशी चर्चा, सुसंवादातून मार्ग काढला जाईल. स्थानिकांनी याबाबत भेट घ्यावी. हा मुद्दा निकाली काढली जाईल.

गेल्या काही दिवसांपासून उंडिर येथील ग्रामस्थ या प्रकल्पाविरोधात रस्त्यावर उतरत आहेत. दरम्यान, रविवारी ३ सप्टेंबर रोजी या प्रकल्पाला विरोधासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या प्रकल्पाविरोधात सुप्रीम कोर्टात जायची गरज पडल्यास जाऊ, असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, मंत्री सुदिन ढवळीकर यांनी हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे, असे ठामपणे सांगितले आहे. तसेच या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांपैकी काही जणच गोव्याचे आहेत, बाकीचे बाहेरचे आहेत, अशी टीका त्यांनी केली होती. या आंदोलनावरून त्यांनी रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षावरही टीका केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Formula 4 Racing In Goa: गोव्यात होणार प्रतिष्ठीत 'फॉर्म्युला- 4 रेस'; गोमंतकीयांना अनुभवता येणार जागतिक रेसिंग स्पर्धेचा थरार

Goa Congress: 'भाजप का काँग्रेसविरोधात लढायचंय ठरवा'; भूमिका स्पष्ट करण्याचा माणिकराव ठाकरेंचा 'आप'ला सल्ला

Vaibhav Suryavanshi: LIVE सामन्यात वाद! आऊट दिल्यावर 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी अंपायरवर भडकला; पुढे काय झालं, पाहा VIDEO

Mohammed Siraj: "जा, रिक्षा चालव!", एका अपयशाने 'हिरो' ते 'झीरो'? मोहम्मद सिराजने नेटिझन्सच्या दुटप्पी भूमिकेवर सोडले मौन, म्हणाला...

दोघांमधील भांडण विकोपाला गेले, पत्नीने रागाच्या भरात पतीच्या अंगावर कढईतील उकळते तेल ओतले

SCROLL FOR NEXT