CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

भारतीय संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहचवावी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

घोगळ साई मंदिरात नूतन मूर्ती प्रतिष्ठापना

दैनिक गोमन्तक

मडगाव: भारतीय संस्कृती ही पुरातन संस्कृती आहे. संस्कृतीचे संचित नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज असून, सर्वांनी तसे प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

साईनगर घोगळ येथील साईमंदिरात नूतन साईमूर्तीची प्रतिष्ठापना सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार उल्हास तुयेकर, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, माजी खासदार नरेंद्र सावईकर व शिर्डी येथे साईबाबा ज्यांच्या घरात राहत होते, त्या कोते-पाटील यांच्या कुटुंबातील वंशज तात्या कोते पाटील खास उपस्थित होते.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत यांनी साई मूर्तिकार भारद्वाज तसेच अन्य मान्यवरांचा सत्कार केला. दामू नाईक यांनी मंदिराचा इतिहास कथन करताना सांगितले की, 1986 साली घोगळ वाड्यावरील तरुणांनी एकत्र येऊन साईबाबांचा एक फोटो लावून तिथे पूजा अर्चा सुरू केली होती. हीच सेवा पुढे कायम राहिली. आज येथे साईबाबांचे भव्य मंदिर उभे झाले आहे ती साईबाबांचीच कृपा असे त्यांनी सांगितले.

या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सर्व धार्मिक विधी झाल्यानंतर स्वप्नील बांदोडकर यांचा ‘राधा ही बावरी’ हा भक्तीगीतांचा कार्यक्रम झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संपादकीय: आमची मते कुठे गेली?

Chandra Gochar 2026: 4 राशींसाठी सुरू होणार 'गोल्डन टाइम'! कर्क राशीत चंद्राच्या प्रवेशाने धनलाभाचे योग, नशीबही देणार साथ

Goa Development: 2014नंतर गोव्याचा 'आश्‍चर्यकारक' विकास; झुआरी पुलाची रचना पाहून शिवराजसिंह चौहान भारावले

Pajifond Cemetery Issue: पाजीफोंड कब्रस्तानचा प्रश्न सोडवू; दामू नाईकांची पाहणी, विजय सरदेसाईंवर टीका

IND vs WI T20I: ODIचा थरार संपताच आता टी-20चा धुमाकूळ! भारत-वेस्ट इंडिजमध्ये 5 सामन्यांची मालिका; जाणून घ्या तारीख, वेळ अन् ठिकाण

SCROLL FOR NEXT