CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांचा धडाका! आदिवासी कल्याणच्या कामगिरीचा घेतला आढावा

Tribal Welfare Department: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आल्तिन, पणजी येथे वित्त खात्याचे अतिरिक्त सचिव विकास गावणेकर, आदिवासी कल्याण संचालक दशरथ रेडकर आणि मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी डॉ. प्रतिभा एलएस, खात्याच्या अधिकाऱ्यांसह आदिवासी कल्याण संचालनालयाच्या कामगिरीचा आढावा घेतला.

गोमन्तक डिजिटल टीम

Dr. Pramod Sawant Assesses Tribal Welfare Initiatives

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आल्तिन, पणजी येथे वित्त खात्याचे अतिरिक्त सचिव विकास गावणेकर, आदिवासी कल्याण संचालक दशरथ रेडकर आणि मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी डॉ. प्रतिभा एलएस, खात्याच्या अधिकाऱ्यांसह आदिवासी कल्याण संचालनालयाच्या कामगिरीचा आढावा घेतला.

बैठकीत आदिवासी व्यवहार मंत्रालयांच्या केंद्र पुरस्कृत योजनेशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच मुख्यमंत्र्यांनी आदिवासी उपयोजनेची अंमलबजावणीचा आणि आदिवासी उपयोजनेची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व खात्यांच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घेतला.

मुख्यमंत्री शिष्यवृत्ती पोर्टलवर राबविण्यात येणाऱ्या योजनांचा समावेश असलेल्या राज्य पुरस्कृत योजनांच्या कामगिरीचाही मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. नोव्हेंबर महिन्यापासून आदिवासी कल्याण संचालनालयामार्फत आधार ब्रिज पेमेंट प्रणालीद्वारे विविध ६ योजनांचे पेमेंट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. अंत्य संस्कार सहाय्य योजना आणि विधवांच्या मुलांना व अनाथ मुलांना आधार देणारी योजना यासारख्या योजनांचे अर्ज ऑनलाइन स्वीकारले जातील जेणेकरून अर्जदाराला अर्ज सादर करण्यासाठी संबंधित जिल्ह्यांच्या प्रमुखांकडे जावे लागणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: राज्यात राजकीय घडामोडी, मुख्यमंत्री सावंतांनी दिल्लीत घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; गोवा भेटीचं दिलं निमंत्रण

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये शतकांचा दुष्काळ! टी20 फॉरमॅटमध्ये दोनच फलंदाजांनी केली कमाल; एक किंग कोहली, दुसरा कोण?

Goa London Flight: अहमदाबाद क्रॅशनंतर बंद झालेली एअर इंडियाची गोवा - लंडन विमानसेवा पुन्हा सुरु होणार, बुकिंग सुरु; वाचा वेळापत्रक

‘नोरा फतेहीसारखं फिगर बनव, नाहीतर…’, नवऱ्याच्या छळाला कंटाळून महिलेची पोलिसात धाव; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Politics: ठरलं! दिगंबर कामत, रमेश तवडकर होणार मंत्री; गुरुवारी 12 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा

SCROLL FOR NEXT