CM Dr. Pramod Sawant  Dainik gomantak
गोवा

Plastic Rice in Goa: मुख्यमंत्री म्हणतात...‘तो’ प्लास्टिकचा नव्हे; तर प्रोटीनयुक्त फॉर्टीफाईड तांदूळ

निकृष्ट रेशन धान्यप्रकरणी दिलगिरी व्यक्त

Kavya Powar

CM Dr. Pramod Sawant on Plastic Rice in Goa: बाणावलीत स्वस्त धान्य दुकानातून दिलेला प्लास्टिक तांदूळ असूच शकत नाही. तो प्रोटीनयुक्त फॉर्टीफाईड तांदूळ असून प्रत्येक गोणीमध्ये किमान एक किलो नियमानुसार मिसळला जातो. त्यामुळे लोकांनी गैरसमज करून घेऊ नये.

तसेच आमदारांनी त्याची शहानिशा केल्याशिवाय अफवा पसरवू नयेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

मुरगाव, सांगे आणि सासष्टी येथील काही रेशन दुकानांतून किडलेला तांदूळ देण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी आमदार वेन्झी व्हिएगस यांनी बाणावलीत पत्रकार परिषद घेत शिधापत्रिकाधारकांना प्लास्टिक तांदळाचा पुरवठा होत असल्याचा दावा केला होता.

त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले, की ‘काही स्वस्त धान्य दुकानदारांना वितरित केलेल्या तांदळाच्या गोणीमध्ये किडी सापडल्या, हे मान्य आहे. मात्र, त्याचे प्रमाण कमी आहे. तरीही या प्रकरणी मी दिलगिरी व्यक्त करतो.

गोव्यात येणारा धान्यसाठा हा भारतीय अन्न महामंडळाकडून पुरवठा केला जातो. त्यामुळे तो धान्यसाठा प्रोटिन्सयुक्त असतो.

आमदारांनी लोकांमध्ये उगाच संभ्रम निर्माण करून अपप्रचार करू नये, अशी बेजबाबदार वक्तव्ये त्याची शहानिशा केल्याशिवाय करणे टाळावीत. लोकप्रतिनिधी असलेले हे आमदार अशा प्रकारांना कसे बळी पडतात, तेच कळत नाही’ असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

जबाबदार अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करा: गोवा फॉरवर्ड

स्वस्त धान्य दुकानांना वितरण केलेल्या निकृष्ट धान्य साठाप्रकरणी सरकारकडून नागरी पुरवठा खात्याच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर काहीच कारवाई होत नसल्याचा आरोप गोवा फॉरवर्डने केला आहे.

याच्या निषेधार्थ पक्ष पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी खात्याच्या मुख्यालयावर धडक दिली. ७ दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई न झाल्यास मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

गोदामातील सडलेल्या तांदळाची चौकशी सुरू असताना या प्रकरणाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांकडे स्पष्टीकरणही मागण्यात आले नाही. खात्याचे संचालक गोपाळ पार्सेकर हे सडलेल्या तांदळाचे प्रकरण गंभीर असताना ते रजेवर गेले आहेत.

या खात्याच्या अधीक्षक उमा मालगावकर यांच्यासमोर गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनी हा सुरू असलेल्या सावळ्या गोंधळाबाबत जाब विचारत कार्यालयातच ठिय्या मारला. त्यानंतर अतिरिक्त ताबा असलेल्या उपासना माझगावकर यांनी खात्यात प्रवेश केला व या नेत्यांची गाऱ्हाणी ऐकून घेतली.

प्रत्येक गोणीची तपासणी अशक्य

मंगळवारी संध्याकाळी नागरी पुरवठा खात्याचे सचिव संजीत रॉड्रिग्स यांनी पत्रकार परिषदेतून खात्याची भूमिका स्पष्ट केली. खात्यातर्फे दरमहिना ३ हजार मेट्रिक टन धान्यसाठ्याचे वितरण होते. म्हणजेच सुमारे ६० हजार तांदळाच्या गोण्यांता गोदामात साठा होतो. त्यामुळे त्यात काही गोणींना कीड लागण्याची शक्यता असते. इतक्या प्रमाणात गोणीतील प्रत्येकाची तपासणी किंवा नमुना घेऊन तपासणी करणे अवघड आहे, असे रॉड्रिग्स म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT