cm Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant : सण, धार्मिक उत्सवाच्या काळात ध्वनिप्रदूषणाचं काय? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं

ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला गोवा सरकारचा महत्त्वपुर्ण निर्णय

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा राज्यासाठी न्यायालयाने काढलेल्या आदेशाने मोठ्या आवाजातील संगीत पार्ट्यांना निर्बंध घातले आहेत. या मुद्यावरुन राज्यात आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी देखील झडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुन्हा धार्मिक कार्यक्रम, सणासुदीच्या काळात हे निर्बंध शिथिल केले जाणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

(CM Pramod Sawant informed the restrictions related to noise pollution during the festival)

मिळालेल्या माहितीनुसार आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज सणासुदीच्या काळात ध्वनिप्रदूषणासंदर्भातील निर्बंधांमुळे चर्च आणि मंदिरांमधील कार्यक्रमांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. असे स्पष्ट केले आहे. याबाबत पर्यावरण मंत्री निलेश काब्राल यांनी देखील सरकारची भुमिका स्पष्ट केली असल्याचं सावंत म्हणाले.

ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला गोवा सरकारचा महत्त्वपुर्ण निर्णय

ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला गोवा सरकारच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने सांस्कृतिक अथवा धार्मिक उत्सवाच्या प्रसंगी रात्रीच्या वेळी लावल्या जाणाऱ्या ध्वनिक्षेपक मर्यादेवर सूट दिली आहे. त्यानुसार आता मध्यरात्री 12 पर्यंतच संगीत वाजवता येणार आहे. याबाबतचा निर्णय आज गुरुवारी सरकारने प्रसिध्दिपत्रकाद्वारे जाहीर केला.

काही दिवसांपूर्वी 31 डिसेंबरपर्यंत मध्यरात्रीपर्यंत ध्वनिक्षेपक मर्यादेवर सूट मिळण्‍याची शक्यता पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी व्यक्त केली होती. पर्यावरण संरक्षण कायदा हा केंद्र सरकारच्या अखत्‍यारीत येतो. शिवाय उच्च न्यायालय सध्‍या ध्‍वनिप्रदूषणावर लक्ष ठेवून आहे असेही काब्राल म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT