CM Pramod Sawant, Viththalwadi Temple Goa Dainik Gomantak
गोवा

Mapusa News: शंभर वर्षांचा इतिहास लाभलेल्या देवस्थानातर्फे मुख्यमंत्री सावंत यांचा गौरव

CM Pramod Sawant: विठ्ठल-रखुमाई देवस्थानतर्फे एकादशीनिमित्त तुषार टोपले यांच्या हस्ते सन्मान

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा शहराच्या मध्यभागी असलेल्या क्षेत्र विठ्ठलवाडी येथील शंभर वर्षाचा इतिहास लाभलेल्या श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थानच्या वतीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा आषाढी एकादशीनिमित्त अध्यक्ष तुषार टोपले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी उपसभापती जोशुआ डिसोझा, नगराध्यक्ष डॉ. नूतन डिचोलकर, देवस्थानचे सचिव परेश नाटेकर, खजिनदार दिनेश मिशाळ, मुखत्यार सूरज डांगी, प्रसाद कवळेकर, श्रेयश कवळेकर, रितेश मणेरकर, युवांकुर कर्पे, उर्वेश नाटेकर, प्रिया मिशाळ, सुशांत हरमलकर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, की आज गोमंतकीय जनता संस्कृती तसेच अध्यात्माकडे वळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारत आज विकसित भारत व सुसंस्कृत भारत घडत आहे. आजची तरुण पिढी संस्कृती सांभाळण्यासाठी पुढे येत आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटायला गोव्यातून हजारो वारकरी जात आहेत, ही अभिमानाची बाब आहे.

राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी विठ्ठलवाडीतील श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. आषाढी एकादशीनिमित्त सारस्वत विद्यालयाच्या पूर्व प्राथमिक विभागातर्फे मंदिरात वारी आणली होती. या वारीमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सहभागी झाले होते. संध्याकाळी ‘ज्ञानबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम,’ ‘जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठला’च्या नामघोषात भजनाला सुरवात होऊन क्षेत्र विठ्ठलवाडी विठ्ठलाच्या नामात दुमदुमून गेली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT