Goa Whatsapp Fraud Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्र्यांचे बनावट व्हॉटसॲप खाते प्रकरण ; औरंगाबादचा युवक ताब्यात

विविध क्षेत्रातील नागरिकांना संदेश पाठवून खळबळ माजवून दिलेल्या संशयित सय्यद इजाझ (42) याला औरंगाबाद येथून ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावे बनावट व्हॉटसॲप खाते उघडून राजकीय व्यक्ती तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांना संदेश पाठवून खळबळ माजवून दिलेल्या संशयित सय्यद इजाझ (42) याला औरंगाबाद येथून ताब्यात घेतले आहे. प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून संशयिताची चौकशी सुरू असल्याची माहिती सायबर गुन्हे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

या बनावट व्हटस्अपप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून तक्रार दाखल झाल्यानंतर सायबर गुन्हे विभागाची यंत्रणा गतिमान झाली होती. या विभागाकडे असलेल्या अत्याधुनिक तपास यंत्रणेच्या आधारे हे मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा थांगपत्ता लागला होता.

त्याच्यावर सायबर गुन्हे अधिकाऱ्यांनी या यंत्रणेचा वापर करून पाळत ठेवली होती. त्याचा ठोस ठावठिकाणी कळाल्यावर विभागाचे पोलिस पथक औरंगाबाद येथे जाऊन त्याला ताब्यात घेऊन गोव्यात आणले. त्याची सखोल चौकशी सुरू आहे.

पोलिस प्रमुखांनाही दणका

काही अज्ञातांनी माजी पोलिस महासंचालक इंद्रदेव शुक्ला यांच्या नावाने बनावट व्हॉटस्अप खाते उघडून त्यावर विद्यमान पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांचे छायाचित्र डाऊनलोड केले.

या खात्यावरून अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात येत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याचाही शोध सुरू आहे असे सायबर गुन्हे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT