Goa CM Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant: सरकारी नोकरी घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी दिली धक्कादायक माहिती! दिले कठोर कारवाईचे संकेत

Goa Job Scam: मुख्यमंत्री म्हणाले, सध्या राज्यभर गाजत असलेल्या सरकारी कर्मचारी घोटाळा प्रकरणात दोन सरकारी अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. अशा प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या व्यक्तीसह गुंतलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant About Pooja Naik Job Scam In Goa

पणजी: सरकारी नोकरीच्या बदल्यात पैसे घेतले जात असल्याचे आरोप केवळ निराधार नसून असे करणाऱ्यांपैकी आणि सध्या अटकेत असलेल्या पूजा नाईक हिने दोन अधिकाऱ्यांच्या मदतीने उमेदवारांना सरकारी नोकऱ्याही मिळवून दिल्या असल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज उघड केली. दक्षता सप्ताहाच्या उद्‍घाटन कार्यक्रमात सचिवालयात बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, सध्या राज्यभर गाजत असलेल्या सरकारी कर्मचारी घोटाळा प्रकरणात दोन सरकारी अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. अशा प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या व्यक्तीसह गुंतलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

वशिल्याने नोकरी मिळविलेले गोत्यात

संशयित पूजा नाईक हिच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक माहिती बाहेर आली आहे त्यात तिने गेल्या एका दशकात अनेकांना सरकारी खात्यात नोकऱ्या दिल्याचा दावा केला आहे.

पूजा हिच्या घराची पोलिसांनी झडती घेतली, तेव्हा विविध खात्यामध्ये नोकरीसाठी अर्ज केलेल्या सुमारे ५० अर्जदारांचे अर्ज सापडले आहेत ते जप्त करण्यात आले आहेत.

जप्त केलेले अर्ज वाहतूक, पीडब्ल्यूडी नदी परिवहन, कृषी या खात्यांशी निगडित आहेत.

जप्त केलेल्या अर्जातील उमेदवार व पूजा हिने सरकारी खात्यांत नोकरीस लावलेल्यांना म्हार्दोळ पोलिस लवकरच समन्स पाठवून चौकशीस बोलवणार आहेत.

पूजाचे दहावेळा विदेश दौरे; आलिशान गाड्या, ४ फ्‍लॅट

पूजा हिच्याकडे ऑडी ते फॉर्च्यूनर अशा पाच आलिशान गाड्या सापडल्या असून तिच्याकडे ४ सदनिकाही आहेत. तिने आठ-दहा वेळा विदेश दौरे केलेले आहेत. पूजा हे मुख्यमंत्र्यांच्या साखळी येथील निवासस्थानी एका व्यक्तीला घेऊन आली होती. त्यावेळी दोन मिनिटे खासगीत बोलायचे असे तिने मुख्यमंत्र्यांना सांगितले आणि मुख्यमंत्र्यांना संशय आला.

तिच्यासोबत आलेल्या व्यक्तीला नोकरीसाठी किती पैसे दिले यावरून मुख्यमंत्र्यांनी हटकले यावरून तिची पोलखोल झाली. तिला महिला शिपायाकरवी डिचोली पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. तेथे तीन जणांचे घेतलेले पैसे तिने परत केल्याने ती सुटली अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उघड केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT