CM Pramod Sawant in Shigmo Parade Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmo: ...आणि मुख्यमंत्र्यांनीही घेतला ढोल वाजवण्याचा आनंद

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्यातील कला प्रेम जागे करताना चक्क ढोल वाजवून शिगम्याचा आनंद घेतला.

दैनिक गोमन्तक

Goa Shigmo: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्यातील कला प्रेम जागे करताना चक्क ढोल वाजवून शिगम्याचा आनंद घेतला. शुक्रवारी रात्री डिचोलीत शासकीय शिगमोत्सव मिरवणूकीत सहभागी होताना त्यांनी ढोल वाजवून सर्वांना आश्चर्यचकीत केले. त्यांच्याबरोबर डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनीही ढोलावर बडी मारली.

डिचोलीत शुक्रवारी शिगमोत्सव मिरवणूक प्रचंड उत्साहात पार पडली. साखळी येथील शिगमोत्सव मिरवणुकीत सहभागी होऊन मुख्यमंत्री डॉ. सावंत रात्री उशिरा डिचोलीत उपस्थित राहिले. डिचोलीत शिगमोत्सव मिरवणुकीत सहभागी होताना मुखमंत्र्यांनी काही क्षण ढोलाचा ठेका धरला.

बोर्डेतून मिरवणुकीला प्रारंभ

बोर्डे वडाकडून श्री वडेश्वर देवाच्या प्रांगणातून शिगमोत्सव मिरवणूकीला प्रारंभ झाला. भायली पेटमार्गे छत्रपती शिवाजी महाराज सर्कल आणि मैदानाकडून कदंब बसस्थानकावर आल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणुकीत सहभागी पुराणकालीन कथावर आधारीत आकर्षक चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

रोमटामेळ आणि लोकनृत्यांचा अविष्कार तसेच विविध वेशभूषा केलेले कलाकार, यामुळे शिगमोत्सव मिरवणुकीचे वातावरण फुलून गेले होते. बोर्डे, भायलीपेट आदी मिरवणुकीच्या मार्गाच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती. रात्रीपर्यंत मिरवणुकीचा जल्लोष सुरु होता. पोलिस कायदा सुव्यवस्था आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवून होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

Sheikh Hasina Press Conference: 'मी जेल आणि मृत्यूला घाबरत नाही!', शेख हसीना यांचा मायदेशी परतण्याचा थेट इशारा; भारतातील पत्रकार परिषदेने उडवली खळबळ

SCROLL FOR NEXT