Sonali Phogat Dainik Gomantak
गोवा

Sonali Phogat Case : सोनाली हत्या प्रकरणाचा तपास अखेर सीबीआयकडे सोपवणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचं स्पष्टीकरण; गोवा सरकार केंद्राला पत्र पाठवणार

गोमन्तक डिजिटल टीम

Sonali Phogat Case : सोनाली फोगट हत्या प्रकरणाचा तपास अखेर सीबीआयकडे सोपवण्यात येणार आहे. तसं पत्रच गोवा सरकार केद्राला पाठवणार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता सोनाली हत्या प्रकरणाच्या तपासाला आणखी गती येणार आहे.

सोनाली फोगट हत्या प्रकरणात अगदी सुरुवातीपासूनच सीबीआय तपासाची मागणी होत होती. आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवत असल्याची घोषणा केली आहे. लोकांनी आधीपासूनच हा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती. प्रामुख्याने सोनाली यांच्या मुलानेही हीच मागणी केली होती. त्यामुळे आपण आज हा तपास सीबीआयकडे सोपवत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. केंद्रीय गृहमंत्र्यांना या संदर्भात आपण पत्र लिहिणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

आमचा आमच्या गोवा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. त्यांचा तपासही योग्य दिशेने सुरु आहे. मात्र केवळ लोकांची मागणी असल्यामुळे आपण हा तपास सीबीआयकडे सोपवत असल्याचंही मुख्यमंत्री पुढे म्हणाले आहेत.

उत्तर गोव्यातील हणजुण येथे ड्रग्स पाजून हत्या केलेल्या भाजप नेत्या सोनाली फोगट मृत्यू प्रकरण सीबीआयकडे द्यावे, अशी मागणी करत सर्वजातीय खाप महापंचायतीने हरियाणा सरकारवर दबाव वाढवला आहे. याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा याचा राजकीय परिणाम भोगावे लागेल असा सज्जड दम महापंचायतीने दिला असून याच मागणीसाठी तीव्र विरोध दर्शवत 24 सप्टेंबरनंतर गोवा खंडपीठात याचिका दाखल करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान सोनाली फोगट हत्या प्रकरणात संशयित सुधीर संगवान आणि सुखविंदर सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दोघांनाही म्हापसा कोर्टाने 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. शनिवारी 10 सप्टेंबर रोजी म्हापसा कोर्टात सोनाली फोगट प्रकरणी सुनावणी झाली, त्यावेळी कोर्टाने ही कोठडी वाढवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT