Goa CM Pramod-Sawant Dainik Gomantak
गोवा

IIT Goa : सांगेत आयआयटी होणारच!; मुख्यमंत्र्यांनी सुनावलं

कोणावरही अन्याय होणार नाही याची सरकार काळजी घेईल. मात्र, आयआयटी होईलच असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

गोमन्तक डिजिटल टीम

IIT Goa : आयआयटी हा शैक्षणिक प्रकल्प असून त्यासाठी जमीन देणे हे सरकारचे काम आहे. काही लोकांना विरोधाला विरोध करायची सवय लागली असून या नकारात्मक विचारातून बाहेर यावे. कोणावरही अन्याय होणार नाही याची सरकार काळजी घेईल. मात्र, आयआयटी होईलच असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. आयआयटीच्या नियोजन संदर्भात आज पणजीतल्या जीएसटी सभागृहात बैठक झाली. यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘सध्याच्या प्रस्तावित आयआयटीची जमीन सरकारची असून काही ठिकाणी नागरिकांनी कब्जा केला आहे. मात्र, या प्रकल्पासाठी कोणावरही अन्याय होणार नाही. ज्यांची जमीन जाणार आहे, त्यांनी आपले सर्व्हे नंबरबरोबर कागदपत्रांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यावी. आपले क्लेम सादर करावेत. त्याची योग्य ती दखल सरकार घेईल’, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तर काही लोक गैरसमज पसरवून आयआयटीला विरोध करत आहेत. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. मात्र, कोणावरच अन्याय होणार नाही याची दखल सरकार घेईल, असं मंत्री सुभाष फळदेसाई यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सांगे येथील प्रस्तावित आयआयटी विरोधात सलग तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले. काल सोमवारी दुपारी दीड वाजता कोठार्ली येथे सर्व्हेक्षण करण्यासाठी सर्व्हे अधिकारी पोलिस बंदोबस्तात गेले होते. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना रोखले. पोलिस उपअधीक्षक नीलेश राणे यांनी समजावूनही शेतकरी भूमिकेवर ठाम राहिले. यावेळी शेतकरी आणि पोलिसांत झटापट होऊन चार महिला शेतकरी जखमी झाल्या.

सांगे आयआयटी प्रकल्प साकार करण्यासाठी सर्व्हेक्षण अंतिम टप्यात पोहचले असून आज शेवटचे सहा पॉईंट मार्किंग करण्याचे शिल्लक होते. शेतकऱ्यांना आज ते पूर्ण करणार याची कल्पना असल्याने सुमारे शंभरेक महिला वाट अडवून राहिल्या होत्या. तो अंदाज आल्याने पोलिस बळ वाढविण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Samuel Braganza Case: सॅम्युअल मृत्यूप्रकरणी गोपनीय अहवाल सादर, प्रकरणाला निर्णायक वळण; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

Cricketer Suicide: 'माझी संघात निवड झाली नाही...'; सुसाइड नोट लिहून क्रिकेटपटूची आत्महत्या, क्रीडाविश्वात हळहळ

Bhiwandi Building Collapse: 'जीव वाचवण्यासाठी पहिल्या मजल्यावरून उडी मारली'; भिवंडी दुर्घटनेत बचावलेल्यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव VIDEO

Salaulim Dam: साळावली धरण अखेर 'ओव्‍हरफ्‍लो', यंदा तब्‍बल 35 दिवसांचा विलंब; पर्यटकांसाठी निसर्गाचा आकर्षक नजराणा

Rohit Sharma Message Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर रोहित शर्माची भावनिक पोस्ट; म्हणाला, "अनेक वर्षे एकाच ड्रेसिंग रूममध्ये..."

SCROLL FOR NEXT