CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: मासळी व्यवसाय वाचविण्यासाठी पुढे या, नारळी पोर्णिमेच्या निमित्ताने CM सावंतांची गोव्यातील तरुणांना हाक

Goa Fishing Industry: मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'मासेमारी व्यवसाय गोमंतकीयांच्या हातातून जाऊ नये यासाठी राज्यातील प्रत्येक पंचायतीत एक व्यवसायिक तयार होणे खूप निकडीचे बनले आहे.'

Manish Jadhav

राज्यात मागील दोन महिन्यांपासून बंद असलेल्या मासेमारीस 1 ऑगस्टपासून सुरुवात झाली. याच पार्श्वभूमीवर आज (19 ऑगस्ट) नारळी पोर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोठे वक्तव्य केले. सावंत म्हणाले की, 'मासेमारी व्यवसाय गोमंतकीयांच्या हातातून जाऊ नये यासाठी राज्यातील प्रत्येक पंचायतीत एक व्यवसायिक तयार होणे खूप निकडीचे बनले आहे.'

दरम्यान, मुख्यमंत्री सोमवारी मत्स्यउद्योग खात्यामार्फत आयोजित नारळी पोर्णिमेच्या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमात मंत्री नीळकंठ हळर्णकर, संचालक डॉ.शमिला मोंतेरो, सचिव ई वल्लभन तसेच पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'राज्यात पूर्वी मासेमारी व्यवसाय गोमंतकीयांच्या हातात होता. घरोघरी जाऊन मासे विकणारे लोक कोकणीमधून बोलत होते. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. आज कोकणी सोडून वेगळीच भाषा आपल्या कानावर पडते. त्यामुळे हा व्यवसाय आपल्या हातातून जाऊ नये. गोमंतकीयांनी विशेषत: राज्यातील तरुणांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. या व्यवसायात मोठा आर्थिक फायदा आहे. सरकारकडून व्यवसायिकांना मागेल ती मदत केली जातेय.'

मुख्यमंत्री सावंत पुढे असेही म्हणाले की, ''नील क्रांतीचे स्वप्न पूर्ण करताना समुद्राची स्वच्छता राखणेही तेवढेच निकडीचे बनले आहे. अनेकजण समुद्रात निर्माल्य, कचरा फेकून देतात. तर काही उद्योगही प्रक्रिया न केलेले पाणी थेट समुद्रात सोडू देतात. त्यामुळे प्रदूषण कमालीचे वाढले आहे. याशिवाय, हाच समुद्रात टाकलेला कचरा माशाच्या पोटात जावून तो पुन्हा आपल्या शरीरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज आपण सर्वांनी नारळी पोर्णिमेच्या (Narali Purnima 2024) दिवशी समुद्रात कचरा टाकणार नाही अशी शपथ घेतली पाहिजे.''

शेवटी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'येत्या शैक्षणिक वर्षापासून बीएससी इन फिशरीज सायन्स हा अभ्यासक्रम सुरु करण्याचा सरकार (Government) विचार करतेय. यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परराज्यात जाण्याची गरज पडणार नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT