CM Pramod Sawant and Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्री सावंतांनंतर विश्‍वजीत राणे 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये

तज्ज्ञ समिती नेमून लवकरच नीती आयोगाची भेट घेणार असल्याची माहिती राणे यांनी दिली.

दैनिक गोमन्तक

पणजी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी निकृष्ट रस्त्यांना जबाबदार असलेल्यांवर थेट कारवाई करीत आपण ‘अ‍ॅक्शन मोड’वर आल्याचे संकेत दिले. त्यानंतर पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी घरांना क्रमांक देण्यासाठी पंच आणि पंचायत सचिवांना पैसे देऊ नका आणि कुणी मागितल्यास थेट माझ्याकडे तक्रार करा, असे सूचित केले होते. आता नगरनियोजन मंत्री विश्‍वजीत राणे हेही आक्रमक झाले असून त्यांनी भ्रष्टाचारमुक्तीची घोषणा केली. (CM Pramod Sawant and Vishwajit Rane in action mode)

आपल्या खात्यांमध्ये सरकारी कामांसाठी कोणी पैसे मागत असेल तर त्याची थेट तक्रार आपल्याकडे करा, आपण त्यावर कारवाई करू, असे सांगत अशा तक्रारी नोंदवण्यासाठी नवी हेल्पलाईन आणि ईमेल जाहीर करणार असल्याची घोषणा केली.

दक्षिण गोव्यासाठी नवे वैद्यकीय महाविद्यालय
गोव्यात (Goa) सध्या केवळ उत्तर गोव्यात (North Goa) एकमेव सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आहे. त्यामुळे त्यावर बराच ताण येतो. दक्षिण गोव्यासाठी खासगी किंवा सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आरोग्य खात्याचा प्रयत्न असून यासाठी तज्ज्ञ समिती नेमून लवकरच नीती आयोगाची भेट घेणार असल्याची माहिती राणे यांनी दिली. आरोग्य खात्यातील सुधारणांसाठी शंभर नव्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे राणे यांंनी स्पष्ट केले.

पारदर्शक कारभार
सावंत मंत्रिमंडळात विश्‍वजीत राणे (Vishwajit Rane) यांच्याकडे आरोग्य, नगरनियोजन, नगरविकास, महिला आणि बाल कल्याण, वन या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देत त्यांना क्रमांक दोनवरील पद दिले. मुख्यमंत्र्यांनंतर आता मंत्री राणे यांनी आक्रमक पवित्रा घेत आपल्या खात्यांमध्ये मोठ्या बदलांचे संकेत दिले आहेत. हे करताना स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन करण्यावर भर दिला आहे. त्यांनी भ्रष्टाचार मुक्तीसाठी नवी हेल्पलाईन आणि इमेल जाहीर करणार असल्याचे सांगितले. कोणीही सामान्य व्यक्ती या इमेलवर तक्रार नोंदवू शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT