Goa CM Pramod Sawant With BJP President J P Nadda Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: भाजप मुख्यालयाची पायाभरणी जे. पी. नड्डा यांच्या हस्ते

CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्षांनी दिल्लीत घेतली राष्ट्रीय अध्यक्षांची भेट

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी-जुने गोवे बगल रस्त्यालगत बांधण्यात येणाऱ्या भाजप गोवा मुख्यालय इमारतीची पायाभरणी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आज (मंगळवारी) रात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी नड्डा यांना यासाठीचे निमंत्रण दिले. याच महिन्यात ही पायाभरणी केली जाणार आहे.

मुख्यमंत्री आज दुपारनंतर तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. आसगाव येथील आगरवाडेकर यांचे बेकायदेशीरपणे घर पाडण्याचे प्रकरण सध्या गाजत असल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाकडून त्यांना चर्चेसाठी बोलावले असल्याची माहिती पसरली होती.

मात्र, मुख्यमंत्र्यांनी आपली दिल्ली भेट पूर्वनियोजित होती, असे सांगितले. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर तेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या नड्डा यांच्याशी सविस्तर चर्चा झाली नव्हती. ती करण्यासाठी नड्डा यांची भेट घेतली. तानावडे हे संसदेचे अधिवेशन असल्याने तेही दिल्लीत होते, ते बैठकीत सहभागी झाले. शहा यांची भेट घेण्यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत काही निश्चित झालेले नव्हते.

आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर यांचे घर पाडण्याच्या प्रकरणात पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांच्यावर ठपका ठेवल्यानंतर महासंचालकांची बदली केली जाईल, अशी अटकळ व्यक्त केली जात आहे.

आगरवाडेकर यांचे घर जसपाल सिंग यांच्या सांगण्यावरूनच पाडण्यात आले. त्याबाबत त्यांनी आपल्याला धमकीही दिली होती, असा दावाही प्रशल नाईक देसाई यांनी केला आहे. या प्रकरणाने आतापर्यंत अनेक वळणे घेतलेली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. सावंत दिल्लीत शहा यांना भेटतील, अशी चर्चा होती. मात्र, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत त्यांची ही भेट ठरली नव्हती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: उमेदवारीचे निकष, रणनीतीही ठरणार; भाजप राज्य कार्यकारिणीची आज बैठक

घाबरू नका, पुरेसा पाणीसाठा! 15 दिवस पाऊस नसला, तरी टंचाई भासणार नाही - सुभाष शिरोडकर

Horoscope: शनिवारी चमकणार नशीब! 'या' राशींसाठी दिवस ठरणार खास; नोकरीत यश, व्यवसायात भरभराट आणि आर्थिक लाभाचे संकेत

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

SCROLL FOR NEXT