Siddharth Naik And Goa cm Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

सिद्धार्थकडून स्वावलंबनाची प्रेरणा घ्या : मुख्यमंत्री सावंत

प्रधानमंत्री राष्ट्रीय रोजगार प्रशिक्षण मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

दैनिक गोमन्तक डिजिटल

सिद्धार्थ दिलीप नाईक या एका सामान्य दिव्यांग मुलाने स्वतःच्या भविष्यासाठी सुरू ठेवलेल्या मेहनत व कष्टाची ओळख सोमवारी (ता.12) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वतः करून दिली.

दिव्यांगत्वावर मात करून स्वावलंबी बनण्यासाठी सिद्धार्थ करीत असलेल्या कामाची माहिती मुख्यमंत्र्यांनी रवींद्र भवन साखळीत आयोजित प्रधानमंत्री राष्ट्रीय रोजगार प्रशिक्षण मेळाव्यात करून दिली.

या मेळाव्याचे उद्‌घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे युवांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देणारे भाषण झाले. त्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांना कार्यक्रमस्थळीच सिद्धार्थ नाईक याने गाठले व विक्रीसाठी आणलेली कोकमची आमसुले विकत घेण्याची विनंती केली. त्याच्याकडून आमसुले घेतल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्याची ओळख करून दिली.

दिलखुलास कौतुक

सिद्धार्थ नाईक हा दिव्यांग असून त्याने संजय स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर चेअरमन गुरुदास पावसकर यांच्या मदतीने घरीच फाईल बनविण्याचे मशीन घातले. या कामात त्याला त्याची आई मदत करते. यातूनच तो आपला उदरनिर्वाह करत आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपस्थितांना सांगत सिद्धार्थच्या प्रेरणादायी कामाची माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT