CM Fellowship Dainik Gomantak
गोवा

CM Fellowship: अ‍ॅमँडा मीनेझिसला सीएम फेलोशिप; अमेरिकेतील टोलेडो विद्यापीठात 'या' विषयात करणार संशोधन

फेलोशिपद्वारे पात्र विद्यार्थ्यांना नियमित स्टायपेंड

Akshay Nirmale

CM Fellowship: अ‍ॅमँडा मीनेझिस या विद्यार्थिनीला चीफ मिनिस्टर फेलोशिप प्रोग्राम अंतर्गत फेलोशिप जाहीर करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. अ‍ॅमँडा ही सध्या पीएच.डी. करत आहे. तिच्या संशोधन अभ्यासासाठी तिला ही फेलोशिप देण्यात आली आहे.

गोवा सरकारच्या डिरेक्टोरेट ऑफ प्लॅनिंग, स्टॅटिस्टिकतर्फे पात्र विद्यार्थ्यांना ही फेलोशिप देण्यात येते. यात संशोधनासाठी नियमित स्टायपेंड दिला जातो. अ‍ॅमँडा ही पणजीतील ताळगावची रहिवासी आहे. तिची शैक्षणिक कारकिर्द उत्तम राहिली आहे. त्यातूनच तिला या फेलोशिपची संधी मिळाली आहे.

अमेरिकेच्या ओहायो येथील युनिव्हर्सिटी ऑफ टोलेडो येथे वैद्यकीय रसायनशास्त्रात ती संशोधन करत आहे. या विद्यापीठात पीएच.डी. विद्यार्थी म्हणून तिची निवड झाली आहे. विविध शैक्षणिक पार्श्वभूमीतील आशादायी, क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना संशोधन कार्यासाठी नियमित स्टायपेंड देऊन मदत करणे हे सीएम फेलोशिप प्रोग्राम (CMFP) चे उद्दिष्ट आहे.

दरम्यान, अ‍ॅमँडाने या फेलोशिपसाठी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. तिने गोव्यातील युवकांना या फेलोशिपसाठी अर्ज करण्याचेही आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Badminton: बॅडमिंटन कोर्टवर युवा खेळाडूंचा जलवा; अखिल गोवा बॅडमिंटन स्पर्धेत शाहीन-सुफियाची चमक, अंतिम फेरीत दाखल

Goa Ranji Cricket Team: गोव्याच्या रणजी संघासाठी लवकरच नवा 'प्रशिक्षक', गतमोसमातील मिलाप मेवाडा अनुपलब्ध; नियुक्तीबाबत 'GCA'त विचारमंथन

VIDEO: अमेरिकेला डावललं अन् पाकड्यांना जवळ केलं! कतारच्या PM चा 'तो' व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नक्की काय घडलं?

Indian Politics: काही पक्ष फुटतात, काही का टिकतात?

Water Pipeline Burst: ट्रकच्या धडकेने जलवाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी वाया, कुळण-कारापूर येथील घटना

SCROLL FOR NEXT