Goa CM Sawant Meet Union Minister anurag thakur Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी मुख्यमंत्र्यांची दिल्लीत धावाधाव...

केंद्राकडे मदतीची याचना : केंद्रीय क्रीडामंत्री, अर्थमंत्र्यांची घेतली भेट

गोमन्तक डिजिटल टीम

Goa CM Sawant Meet Union Minister Anurag Thakur: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन पदरात पाडून घेतले तरी आर्थिकदृष्‍ट्या ते पेलवणारे नसल्याने मुख्यमंत्र्यांना आज दिल्लीवारी करावी लागली.

25 ऑक्टोबर पासून या स्पर्धा आयोजित करण्याचे निश्चित झाले असले तरी बहुतेक पायाभूत क्रीडा सुविधा विकासित करण्यासाठी येत्या दीड दोन महिन्यात पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागेल याची वित्तमंत्री म्हणून कल्पना आलेल्या मुख्यमंत्र्यांनी दिल्ली गाठून आज मदतीचे साकडे घातले.

त्यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यात क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची भेट घेत केंद्र सरकारच्या भरीव पाठिंब्याचे आश्वासन मिळवले.

विशेष म्हणजे क्रीडामंत्री गोविंद गावडे या दौऱ्यात सहभागी नव्हते. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाला यापूर्वीच उशीर झाला असला, तरी अद्यापही राज्याने म्हणावी तशी तयारी केली नसल्याचे दिसून येते. अशा क्रीडा स्पर्धा हे पायाभूत सुविधा निर्मितीची संधी मानली जाते.

मात्र, ती संधी गोव्याने कधीच गमावली आहे. त्यामुळे सायकल स्पर्धेसारख्या काही स्पर्धा राज्याबाहेर घेण्याची नामुष्की राज्यावर ओढवली आहे.

राज्य सरकारने ४५० कोटी रुपयांची तरतूद या स्पर्धेच्या आयोजनासाठी आपल्या अर्थसंकल्पात केली आहे. असे असले तरी भांडवली खर्चासाठी सरकारकडे पैसा नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

सरकार अशा खर्चासाठी भांडवली बाजारातून शंभर कोटी रुपयांचे कर्ज या महिन्याच्या अखेरीस घेणार आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनासाठी केंद्राकडे मदतीचा हात मागण्याशिवाय सरकारकडे पर्याय राहिला नव्हता.

आपल्या तिजोरीची पुरती कल्पना असलेल्या मुख्यमंत्र्यांनी त्यामुळे दिल्ली गाठली आणि या स्पर्धेच्या आयोजनासाठी भरीव आर्थिक मदतीचे आश्वासन मिळवले.

कसिनोतून राज्य सरकारला वार्षिक 500 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. ऑनलाईन गेमिंगवर २८ टक्के जीएसटी आकारण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा असा मुद्दाही या बैठकीत मांडण्यात आला आहे.

२८ टक्के जीएसटी आकारला गेल्यास कसिनो बंद पडतील आणि त्यामुळे सरकार आपल्या महसुलास मुकेल अशी भीती राज्य सरकारला सतावत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT