CM Dr Pramod Sawant called a meeting of the Goa Cabinet today
CM Dr Pramod Sawant called a meeting of the Goa Cabinet today 
गोवा

गोवा मंत्रिमंडळाची आज बैठक; मंत्री विविध मतांवर व्यक्त होणार का?

गोमंन्तक वृत्तसेवा

पणजी : आपत्ती निवारण व्यवस्था असेल किंवा कोविड व्यवस्थापन(Covid Management) याविषयी विविध मंत्र्यांची विविध मते असली, तरी ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत(Cabinet meeting) व्यक्त करणार का? याची माहिती आज मिळणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत(CM Pramod Sawant) आज सकाळी साडेअकरा वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. कोविड महामारीच्या काळात राज्य मंत्रिमंडळाची झालेली नाही. त्यातच वादळाचा तडाखा बसल्यानंतर राज्यभरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यभरात सरकारविरोधी जनभावना प्रबळ झाली आहे. त्यामुळे त्याचे पडसाद आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत उमटणार का? ते पाहावे लागणार आहे.(CM Dr Pramod Sawant called a meeting of the Goa Cabinet today)

मत्रिमंडळाच्या बैठकीत कोणती भूमिका घेणार

ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो यांनी ‘कुठे आहे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा’ अशी जाहीरपणे विचारणा करत मंत्री म्हणून जनतेला मदत करू शकत नाही, याचे वाईट वाटते असे विधान केले आहे. एरवी उठसूठ मुख्यमंत्र्यांना सल्ला देण्याचे आणि कोणता सल्ला दिला, त्याची माहिती पत्रकारांना देणारे हे मंत्री आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणती भूमिका घेतात याकडेही सगळ्यांचे लक्ष आहे.

मुख्यमंत्री कृती दलाची बैठक घेणार

मुख्यमंत्र्यांना या मंत्रिमंडळ बैठकीविषयी विचारले असता त्यांनी सांगितले, की अलीकडे राज्य मंत्रिमंडळाची बैठक झालेली नाही. सर्व मंत्री माझ्याशी संपर्कात असले तरी काही गोष्टींबाबत औपचारिक बैठकीत निर्णय करावे लागतात. काही निर्णय तातडीने घेतले गेले आहेत. त्यांना कार्योत्तर मंजुरी द्यायची आहे. कोविड व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन पातळीवर प्रशासनाने केलेल्या कामाची माहितीही दिली जाणार आहे. त्यात सुधारणा करण्यासाठीही मंत्र्यांची मते जाणून घेतली जातील. आज मुख्यमंत्री सायंकाळी कृती दलाची बैठक घेणार आहेत. कोविड व्यवस्थापनासाठी टाकलेली पावले. कोठे काय चुकले आणि कोणत्या गोष्टी नव्याने करण्याची गरज आहे, याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.कोविड भरतीपूर्व इस्पितळांच्या कामकाजाविषयी या बैठकीत तपशीलाने चर्चा होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT