Collapsed House At Bicholim  Dainik Gomantak
गोवा

House Collapses At Bicholim: बंद घर कोसळून नजीकच्या घरांची पडझड, दोन दुकानांचे नुकसान

Bicholim: धोका ओळखून दुकानदारांनी दुकानातील सामान खाली केले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: वादळी पावसाच्या तडाख्यात भायलीपेट-डिचोली येथील एक जुनाट बंद घर कोसळून या घराला दोन्ही बाजूने टेकून तीन घरांची पडझड झाली. दोन दुकानांनाही झळ बसली. काल (सोमवारी) मध्यरात्री घडलेल्या या घटनेत कोणतीही आपत्ती ओढवली नसली, तरी धोका ओळखून पेडणेकर कुटुंबातील सदस्यांनी मध्यरात्रीच सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला.

काल मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास भायलीपेट येथील कापडी कुटुंबाचे पुरातन जीर्ण घर कोसळले. या घराची डाव्या बाजूची भिंत कापडी आणि पेडणेकर यांच्या घरावर कोसळली. त्यामुळे या घरांच्या भिंतीची पडझड झाली.

या दोन्ही घरांनी दुकाने आहेत.उजव्या बाजूने असलेल्या चणेकर यांच्या घरालाही हादरा बसून या घराचीही पडझड झाली. या तिन्ही घरांना धोका उद्‍भवला आहे. धोका ओळखून दुकानदारांनी दुकानातील सामान खाली केले आहे.

घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष कुंदन फळारी, नगरसेवक अनिकेत चणेकर आणि सुदन गोवेकर यांनी घटनास्थळी जावून पडझडीची पाहणी केली. या घटनेची माहिती मिळताच मामलेदारांच्या निर्देशानुसार तलाठ्यांनी घटनास्थळी जाऊन पडझडीचा पंचनामा केला.

जेसीबी यंत्राच्या सहकार्याने मजतकार्य हती घेण्यात आले. शहरातील सोनारपेट येथील एका बंद घरावर आंबाड्याचे घर कोसळून या घराची मोडतोडझाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT