Today's Goa Live News 15 February 2024| Goa Breaking News Dainik Gomantak
गोवा

Today's Goa News: दिवसभरातील घटना वाचा एका क्लिकवर

Shreya Dewalkar

धक्कादायक! PT शिक्षकाने केला शाळेतील मुलीवर बलात्कार

एका सरकारी शाळेतील शारीरिक शिक्षण विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने त्याच शाळेतील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी संबंधितांविरुद्ध एफआयआर नोंदवला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मजूर महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या जॉयराम कलिताला अटक

आरोपी जॉयराम कलिता याच्या खोलीत राहणाऱ्या एका मजूर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जॉयराम कलिता (मूळ. आसाम वय- 42 वर्ष) याला कलम 376 506(2) अन्वये अटक करण्यात आली आहे.

जयराम कलिता हा वेर्णा उद्योगांसाठी कामगार पुरवठादार आहे. 12 फेब्रुवारी रोजी आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून याविषयी अन्य कोणालाही सांगू नकोस अशी धमकी दिली होती. .

कौटुंबिक छळ प्रकरण! महिलेची पतीसह कुटुंबातील पाच जणांविरोधात तक्रार

कुटुंबियांकडून सतावणूक करून घराबाहेर काढल्याने महिलेची पतीसह कुटुंबातील पाच जणांविरोधात डिचोली पोलिसात तक्रार. पोलिसांकडून गुन्हा नोंद. घटनेतील पिडीत महिला साखळीतील असल्याची माहिती प्राप्त

कळंगुट हनुमान मंदिरामधील चोरी करणारा सीसीटीव्हीत कैद

कळंगुट खोब्रावड्डो येथील हनुमान मंदिरामध्ये 13 फेब्रुवारीला दरोडा पडला होता. त्या संबंधी शोधकार्य सुरु असताना सीसीटीव्हीत एक अज्ञात व्यक्ती आढळून आलाय. त्या व्यक्तीने फंड पेटी आणि समईची लंपास केल्याचे समजतेय.

महाजनांचा वाद; रवळनाथ देवस्थानाचा कालोत्सव बंद

वेळूस देवस्थानाच्या महाजनांमध्ये वाद सुरु झाल्याने रवळनाथ देवस्थानाचा कालोत्सव बंद करण्याचा सत्तरी मामलेदारांनी आदेश दिला आहे.

एकतर्फी प्रेमातून युवतीवर हल्लाप्रकरणी संशयिताला 5 दिवसांची पोलिस कोठडी

व्हॅलेंटाईन डेला एकतर्फी प्रेमातून युवतीवर बाटलीने हल्लाप्रकरणी संशयित मंथन गावडे याला पाच दिवसांची पोलिस कोठडी.

अयोध्येत होणार गोवा भवन, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Bhavan In Ayodhya UP

उत्तर प्रदेश सरकारने जागा दिल्यानंतर अयोध्येत गोवा भवन उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी पत्नी सुलक्षणा सावंत यांच्यासह अयोध्येत श्री रामल्लाचे दर्शन घेत गोव्यातील जनतेसाठी प्रार्थना केली.

म्हादई, पोगो, दुहेरी नागरिकत्व! आरजीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Mission Loksabha 2024 RG Manifesto

आरजीकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध. शुक्रवारपासून घरोघरी जाऊन प्रचार. म्हदई, कोळसा हबला विरोध, गोमन्तकीयांसाठी केंद्रीय नोकऱ्या, जमीन संरक्षण, स्थलांतरितांचा मुद्दा, पोगो, ST समाजाचे घटनात्मक हक्क, दुहेरी नागरिकत्व अशा मुद्यांचा या जाहीरनाम्यात समावेश आहे.

सरकारी खात्यात नोकरीचे आमिष दाखवून 18 जणांना 31 लाखांचा गंडा

सरकारी खात्यात नोकरीचे आमिष दाखवून 18 जणांना 31 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. आगशी पोलिसांनी संशयित जास डिकॉस्ता आणि ज्वेन्सी डायस या दोघां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तिळारी धरण प्रकल्पाच्या मोठ्या जलवाहिनीला मेगा गळती

Tillari Dam Pipeline Likage

तिळारी धरण प्रकल्पाच्या मोठ्या जलवाहिनीला मेगा गळती. डिचोलीतील कातरवाडा परिसरातील प्रकार. मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात असल्याने पाण्याची प्रचंड नासाडी. स्थानिकामध्ये संभ्रम.

वनमार्गे कर्नाटकात मद्याची तस्करी, 5 लाखांचे मद्य जप्त

Illegal Liquor Transport

वनमार्गे कर्नाटकात मद्याची तस्करी. तिरवाळ, खोतीगाव येथे पाच लाख किंमतीचे मद्य जप्त, आठजण ताब्यात. कोणकोण पोलिसांची कारवाई.

शुभारंभ! पर्वरी उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात

Porvorim Flyover

राष्ट्रीय महामार्ग NH 66 वरील पर्वरी उड्डाणपुलाच्या कामाला शुभारंभ. कंत्राटदाराकडून माती परिक्षण. नव्याने मंजूर हा उड्डाणपूल म्हापसा ते पणजी या दोन महत्वाच्या शहरांना जोडणार आहे.

राज्य सरकारातील मंत्री व आमदार आयोध्याला रवाना

राज्य सरकारातील मंत्री व आमदार आयोध्याला रवाना

राज्य सरकारातील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह 20 आमदार व पदाधिकारी आयोध्याला रवाना झाले. रामलल्लाच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वी त्यांनी मोपा विमानतळाबाहेर एकत्रित छायाचित्र काढले.

कोरगाव येथे अडीच लाखांचा गांजा जप्त, दोघांना अटक

अडीच लाख किंमतीचा गांजा प्रकरण बाळगल्याप्रकरणी कोरगाव येथे शुभम समरनाथ शर्मा (27, रा. मुरमुसे तुये) व गोपीनाथ गुणाजी हरमलकर (25, रा. गावडेवाडा मोरजी) या दोघांना अटक केलीय. पेडणे पोलिसांनी बुधवारी (दिनांक 14) ही कारवाई केली.

पोरस्कडे येथे राष्ट्रीय महामार्ग 66 वर कंटेनर पलटी

पोरस्कडे येथे राष्ट्रीय महामार्ग 66 वर कंटेनर पलटी होऊन 100 मीटर अंतरावर जाऊन पडला. दरम्यान कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी या पूर्वी या जंक्शनवर अनेक अपघात होऊन बळी गेले. या ठिकाणी सर्कल ,किंवा उड्डाण पुल उभारावा अशी मागणी होती, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. एका टॅक्सी कारला वाचविण्याच्या नादात वाहन चालकाचा ताबा गेल्याने कंटेनचा अपघात झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

SCROLL FOR NEXT