Parra  Dainik Gomantak
गोवा

Parra News: ..गाव कचरामुक्त करणार! पर्ये पंचायतीने घेतला पुढाकार

Parra Cleanliness Campaign: विद्यालयाच्या मुलांनी भागांमध्ये फेरी काढून कचरा व्यवस्थापन व कचऱ्याचे दुष्परिणाम या संदर्भात जनजागृती केली

गोमन्तक डिजिटल टीम

पिसुर्ले: मोठ्या प्रमाणात उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार वाढू लागलेले आहेत. यातून पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आरोग्याच्या समस्या वाढतात. यामुळे कचरा व्यवस्थापन करण्यावर सरकारने विशेष भर दिला आहे, सूर्याजीराव राणे म्हणाले.

कचरा मुक्त गावासाठी नागरिकांनी सहकार्य करणे, ही काळाची गरज आहे, असे मत सत्तरी तालुक्याचे गटविकास अधिकारी सूर्याजीराव राणे यांनी व्यक्त केले आहे. पर्ये पंचायतीतर्फे पंचायत क्षेत्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता सप्ताह मोहिमेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

व्यासपीठावर पंचायतीच्या सरपंच दीपा यशवंत नाईक ,भूमिका माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिवाकर पोसनाईक विद्यालयाच्या शिक्षिका मनीषा गावस पंचायतीचे पंच सभासद दत्ता राणे, आत्माराम शेट्ये हेमंत राणे व इतरांची खास उपस्थिती होती.

पर्ये पंचायत क्षेत्रातील पर्ये या ठिकाणी विविध भागात साफसफाईची मोहीम हाती घेण्यात आली. त्याचप्रमाणे विद्यालयाच्या मुलांनी भागांमध्ये फेरी काढून कचरा व्यवस्थापन व कचऱ्याचे दुष्परिणाम या संदर्भात जनजागृती केली.

राणे म्हणाले, अनेक वेळा प्लॅस्टिक उघड्यावर टाकण्याचे प्रकार होऊ लागलेले आहेत. त्यातून पर्यावरणाला नुकसानी होऊ लागलेली आहे. नदी पात्र खराब होत आहे.

पोसनाईक म्हणाले, प्रत्येकाच्या मनामध्ये व विचारांमध्ये कचरा याबाबत जादा जागृती करणे काळाची गरज आहे. मुलांनी साफसफाईच्या बाबतीत अत्यंत जागृत राहावे. आपला गाव, आपले घर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य केल्यास देश स्वच्छ होईल.

नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज

सूर्याजीराव राणे म्हणाले, सत्तरी तालुक्यातील प्रत्येक पंचायत क्षेत्रामध्ये कचरा व्यवस्थापना संदर्भात विशेष भर देण्यात येत आहे. यामुळे नागरिकांनी सहकार्य करणे ही काळाची गरज बनलेली आहे. सरकार कचरा व्यवस्थापनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत. त्या मागची अनेक कारणे आहेत. मात्र प्रामुख्याने पर्यावरणाचे रक्षण आपल्याला करायचे असेल व आरोग्याच्या समस्यापासून दूर राहायचे असेल, तर कचऱ्याचे व्यवस्थापन करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT