Cleaning campaign  Dainik Gomantak
गोवा

म्‍हापशात पुन्हा स्‍वच्‍छता मोहीम

पेडे येथील ‘जीवन आनंद’ संस्थेच्या आश्रितांचे योगदान

दैनिक गोमन्तक

म्हापसा: पेडे-म्हापसा येथील जीवन आनंद संस्थेच्या वतीने पुन्हा एकदा आज म्हापसा बाजारपेठ परिसरात स्वच्छ्ता मोहीम राबविण्‍यात आली. रस्त्यावरील निराधारांसाठी संस्थेतर्फे पेडे-म्हापसा येथे कार्यरत असलेल्या आश्रमातील सुमारे बारा आश्रितांचे तसेच संस्थेच्या कार्यकर्त्यांचे या मोहिमेत योगदान लाभले.

ही स्वच्छ्ता मोहीम सकाळी साडेसात ते साडेदहा वाजेपर्यंत राबवण्यात आली. त्‍यासाठी नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांचेही सहकार्य लाभले, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब यांनी दिली.

या मोहिमेवेळी संस्थेचे विद्यमान सचिव संदीप परब, म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद सावंत, संदेश बुर्ये, शिक्षिका पूनम बूर्ये यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच त्यांनीही स्वत:हून या मोहिमेत सहभाग घेतला.

सदर मोहीम यशस्‍वी करण्‍यासाठी जीवन आनंद संस्थेचे कार्यकर्ते प्रसाद आंगणे, नरेश आंगणे, राहुल कांबळे, सुनील परब, सुशील, आनंद काळे, सचिन पुजारे, पल्लवी परब, श्वेता पुजारे व इतरांचेही योगदान लाभले. गोळा केलेला कचरा म्हापसा पालिकेच्या सहकार्याने कुचेली येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात नेण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

Allahabad High Court: "कुटुंबाचा खर्च उचलू शकत नसाल तर लग्नच करु नका!", हायकोर्टाची जळजळीत टिप्पणी; पोटगी नाकारणाऱ्या पतीला मोठा दणका

US Iran War: डोनाल्ड ट्रम्पचा 'डेंजरस' इशारा! इराणचाही चर्चेला नकार आणि युद्धाची ललकारी; घालिबाफ म्हणाले, "धमक्यांनी इराण दबणार नाही!"

SAFF Championship: पाकिस्तानविना गोव्यात रंगणार 'सॅफ फुटबॉल स्पर्धा'; यजमान भारत, गतविजेत्या बांगलादेशसह एकूण सहा महिला संघांत चुरस

Omkar Elephant: 'ओंकार' पोचला उगाडे - सिंधुदुर्गात... सीमोल्लंघन सुरूच; पेडणे वन कर्मचाऱ्यांना तूर्त दिलासा

SCROLL FOR NEXT