Cleaning Campaign File Photo
गोवा

Cleaning Campaign : होंडा येथे कचरा निर्मूलनासंदर्भात जनजागृती

बसस्थानक व नवीन पंचायत इमारत परिसर केला स्वच्छ

दैनिक गोमन्तक

Cleaning Campaign : पर्ये मतदारसंघात येणाऱ्या होंडा पंचायतीच्यावतीने पंचायत संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वच्छ भारत अभियान ग्रामीण दोन या योजनेंतर्गत बुधवारी (ता. २२) कचरा निर्मूलन मोहिमेला सुरुवात करण्यात आली, यावेळी कचरा व्यवस्थापन व निर्मूलन संस्थेच्यावतीने रोड शो करून नागरिकांना कचरा व्यवस्थापन करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली.

यावेळी उपसरपंच रेशम गावकर, पंच स्मिता मोटे, सुशांत राणे, दीपक गावकर, कृष्णा गावकर, सिया बोडके पंचायत सचिव मुला वरक, तसेच स्वच्छ भारत अभियान ग्रामीण भाग दोन या संस्थेच्या संयोजक साक्षी टिकार, सुजित नाईक, भगवान महावीर सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका स्वाती पडते, सुलोचना बाराजणकर आदी उपस्थित होते.

ज्या नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकला त्यांना पंचायत सचिव मुला वरक यांनी दंड ठोठावण्याचा आदेश पंचायत कारकूनला देण्यात आला.

कर्मचाऱ्यांना टी शर्ट व टोप्या

जनजागृती कार्यक्रमात भगवान महावीर सरकारी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी कचरा निर्मूलन संस्थेच्या वतीने पंचायत क्षेत्रात कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टी शर्ट व टोप्यांचे वाटप केले. या मोहिमेची सुरुवात सरपंच शिवदास माडकर यांनी हिरवा झेंडा दाखवून केली

‘रोड शो’द्वारे जनजागृती

होंडा बसस्थानक तसेच नवीन पंचायत इमारतीच्या परिसरात उघड्यावर टाकण्यात आलेला कचरा गोळा करण्यात आला. या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी कचरा उघड्यावर टाकलेला दिसून आला. या कार्यक्रमानंतर होंडा वाडाकडे तसेच होंडा तिस्क येथे रोड शो करून नागरिकांना कचरा व्यवस्थापन करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT