Maye Road Dainik Gomantak
गोवा

Mayem: आधी गटार स्‍वच्‍छ करा, नंतर रस्‍त्‍याला हात घाला! केळबायवाडा-मये स्थानिकांची मागणी

Mayem Road: अगोदर तुंबलेले गटार स्वच्छ करा आणि नंतरच केळबायवाडा-मये येथील क्रीडा मैदानाजवळील रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरण कामाला सुरवात करा, अशी मागणी केळबायवाड्यावरील लोकांनी केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mayem Kelbaiwada Road

डिचोली: अगोदर तुंबलेले गटार स्वच्छ करा आणि नंतरच केळबायवाडा-मये येथील क्रीडा मैदानाजवळील रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरण कामाला सुरवात करा, अशी मागणी केळबायवाड्यावरील लोकांनी केली आहे. गटार स्वच्छ करण्याकडे दुर्लक्ष झाल्यास रस्त्याच्या कामाला आमचा विरोध असेल, असा इशाराही त्‍यांनी दिला आहे.

ंकेळबायवाडा येथील क्रीडा मैदानाला लागून असलेल्या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामाला सध्या हातही घालण्यात आला आहे. मात्र कामाच्‍या बाबतीत स्थानिक नाराज आहेत, असे नागेश नाईक आणि इतर स्थानिकांनी सांगितले.

पावसाळ्यात जवळपासच्या घरांनी पाणी घुसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संबंधित कंत्राटदाराने याकडे लक्ष द्यावे, अशी लोकांची मागणी आहे. रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण ही गरज आहे. मात्र हे काम करताना स्थानिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी अशी मागणी सिद्धेश गावस यांनी केली.

दगडधोंडे, माती कचऱ्याने गटार तुंबले

क्रीडा मैदानाजवळील ज्या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येणार आहे, त्या रस्त्याच्या बाजूने मैदानाला लागून असलेल्या गटाराची दुर्दशा झाली आहे. गटार कचरा, माती, दगड आदी भरून ते तुंबले आहेत. त्यातच आता या गटारात रस्त्याची माती टाकण्यात येत आहे. हे गटार उपसल्याशिवाय रस्त्याचे काम केल्यास, मोठी समस्या निर्माण होऊ शकते, असे केळबायवाड्यावरील ग्रामस्‍थांचे म्‍हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT