Goa Recruitment Dainik Gomantak
गोवा

Goa Recruitment: ‘क’ वर्ग पदभरती : आयोगाने कसली कंबर

Goa Recruitment: जाहिरात देणार : संगणकीकृत लेखी परीक्षेच्या प्रश्नावलीचे काम वेगाने सुरू

दैनिक गोमन्तक

Goa Government: सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकर भरती वादात सापडल्यानंतर आता राज्य सरकारने राज्य कर्मचारी भरती आयोगाच्या कामाला गती दिली आहे.

‘क’ वर्गीय पदे भरण्यासाठी या आयोगाकडून जाहिरात दिल्यानंतर घ्यावयाच्या संगणकीकृत लेखी परीक्षेसाठी प्रश्नावली तयार करण्याचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, परीक्षेनंतर अर्ध्या तासातच निकाल जाहीर केला जाणार आहे. या आयोगाचे सदस्य मिनिनो डिसोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुमारे 200 पदे भरण्यासाठी लेखी परीक्षा घेण्याचा आयोगाचा विचार आहे.

खरे तर ऑक्टोबरमध्येच अशी परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, विविध खात्याकडून पदांची मागणी करणाऱ्या विनंती उशिरा पोहोचल्याने आयोगाने त्यावरील प्रक्रिया पुढे ढकलली होती.

पाटो-पणजी येथील स्पेसीस इमारतीमधील या आयोगाचे कार्यालय सध्या गजबजलेले आहे. लेखी परीक्षा घेण्यासाठी प्रश्नावली तयार करण्याचे काम एका स्वतंत्र यंत्रणेकडे आयोगाने सोपवले आहे.

त्या यंत्रणेकडून डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रश्नावली तयार होऊन मिळाल्यानंतर लेखी परीक्षेची तयारी आयोग करणार आहे. तत्पूर्वी या पदांसाठी जाहिरात दिली जाणार आहे.

खातेनिवडीची उमेदवारांना संधी

राज्य कर्मचारी भरती आयोग पदे भरतीसाठी गुणवत्ता यादी तयार करणार आहे. समजा, कनिष्ठ लिपिक पदासाठी आयोगाने लेखी परीक्षा घेतली तर त्याच्या लेखी परीक्षेची गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे.

त्यात पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना कोणत्या खात्यात सेवा बजावायची आहे, त्या पर्यायाचा निवड करण्याची संधी दिली जाणार आहे.

अर्ध्या तासातच निकाल

साबांखा भरती प्रक्रियेतील निकाल जाहीर करण्यास पाच महिन्यांचा कालावधी लागल्याने सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

त्यामुळे राज्य कर्मचारी भरती आयोगाने लेखी परीक्षा घेतली की परीक्षा संपल्यावर अर्ध्या तासातच निकाल जाहीर केला जाईल, अशी संगणकप्रणाली वापरली जाणार आहे. आयोगाच्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT