Goa Education Secretary Prasad Lolyekar Dainik Gomantak
गोवा

Goa Education: एनसीईआरटीच्या सूचनेनंतरच क्षमता परीक्षा! पाचवी आणि आठवीसाठी तात्काळ लागू नाही; प्रसाद लोलयेकरांची माहिती

Goa Education Secretary Prasad Lolyekar: इयत्ता पाचवी आणि आठवीच्या क्षमता तपासणी परीक्षा सध्या होणार नाहीत. यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना एनसीईआरटीद्वारे आल्यानंतर परीक्षा आयोजित केल्या जातील.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: इयत्ता पाचवी आणि आठवीच्या क्षमता तपासणी परीक्षा सध्या होणार नाहीत. यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना एनसीईआरटीद्वारे आल्यानंतर परीक्षा आयोजित केल्या जातील, असे राज्याचे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी दै. ‘गोमन्तक’चे संपादक - संचालक राजू नायक यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

लोलयेकर म्हणाले, पाचवी आणि आठवीसाठी हा क्षमता तपासणी परीक्षा निर्णय तात्काळ लागू नाही. २०२७ पर्यंत राज्यात सर्व शैक्षणिक स्तरावर नवीन शिक्षण धोरण लागू होईल, परंतु त्यानंतर जरी काही बदल करावे लागले, सुधारणा करायच्या असतील, तर त्यासाठी दोन वर्षांचा कालावधी असेल. २०३० नंतर मात्र बदल करता येणार नाहीत. त्या अनुषंगाने शिक्षण संचालनालय योग्य ती पाऊले टाकत आहे. एनईपीच्या अनुषंगाने अनेक निर्णय घेतले जात आहेत, परंतु या निर्णयांमुळे कोणत्याही प्रकारे विद्यार्थ्यांचे (Students) नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जात जाणार आहे, असेही लोलयेकर यांनी सांगितले.

केंद्रीय संस्थांकडून गोव्याची स्तुती

एनईपीच्या अनुषंगाने राज्यात एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आलेल्या एनसीईआरटी, परख, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे अधिकारी यांनी गोव्यात (Goa) ज्या पद्धतीने नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे त्याची स्तुती केल्याचे राज्य शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT