Kadamba Transport Dainik Gomantak
गोवा

Margao : मडगाव बसस्थानकात पर्यटक, कदंब कर्मचाऱ्यांमध्ये खडाजंगी

पर्यटकांना तिकीट देण्यास नकार दिल्यामुळे वाद

Rajat Sawant

राज्यात नववर्ष स्वागताची तयारी उत्साहात सुरू आहे. नववर्ष स्वागतासाठी लाखो पर्यटक गोव्यात आले असून राज्यातील हॉटेल, समुद्रकीनारे विविध पर्यटनस्थळांवर गर्दी होताना दिसत आहे. गोव्यात पर्यटनासाठी काही पर्यटक खासगी गाड्यांचा वापर करतात तर काही पर्यटक कदंबचा वापर करतात. गोव्यात स्थानिकांना तसेच पर्यटकांना आरामदायी, प्रदुषणविरहीत प्रवास करता यावा यासाठी कदंब महामंडळाने इलेक्ट्रिक वातानुकीलीत बसेसची सेवा सुरु केली आहे.

दरम्यान आज दुपारी मडगाव बस्थानकात कदंब महामंडळाच्या इलेक्ट्रिक वातानुकीलीत बसच्या तिकीट वरुन कदंब कर्मचारी व पर्यटक यांच्यात खडाजंगी पहायला मिळाली. यावेळी पर्यटक प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पुरेशा एसी बसेस असतानाही पर्यटकांना तिकीट देण्यास नकार दिल्यामुळे हा प्रकार घडल्याचे यावेळी उपस्थित प्रवाशांकडून सांगण्यात आले. या घडलेल्या प्रकारबाबत समाजमाध्यमांवर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे कदंबा प्रशासनाने घडलेल्या प्रकाराची दखल घेण्याची गरज आहे.

गुरुवारी सायंकाळी पणजी बसस्थानकावर खासगी बस व इलेक्ट्रीक कदंबा यांच्यात अपघात झाला होता. या अपघातामुळे मात्र प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. यावेळी प्रवाशांनी खासगी बसचालकांच्या मुजोरीवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या. सुदैवाने या अपघातात कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. खासगी बसेस कुठेही स्टॉप मारुन प्रवाशांना उतरवतात, तसेच त्यांना हवे तिथे बसेस पार्क करतात अशा कारणांमुळे हे असे अपघात वारंवार घडत असतात अशी प्रतिक्रिया संतप्त प्रवाशांनी यावेळी व्यक्त केली. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT