Ayushman Bhava Dainik Gomantak
गोवा

Ayushman Bhava: नागरिकांनी आरोग्याबाबत जागरूक असावे!

Ayushman Bhava: सभापती : ‘आयुष्यमान भव’अंतर्गत आरोग्य मेळावा

दैनिक गोमन्तक

Ayushman Bhava: अनेक आजाराची प्राथमिक लक्षणे बऱ्याच वेळा चट्कन लक्षात येत नाहीत. सुशिक्षित लोकही आरोग्यासंदर्भात जागरूक नसतात. अशा वेळी ल़ोकप्रतिनिधींनी विविध स्तरांवर अशा आरोग्य मेळाव्यांचे आयोजन करणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन सभापती रमेश तवडकर यांनी केले.

केंद्र सरकारच्या ‘आयुष्यमान भव’ या योजनेअंतर्गत चावडी-काणकोण येथील सामुदायिक इस्पितळात आरोग्य मेळावा आयोजित केला होता. यावेळी व्यासपीठावर तवडकर यांच्यासह नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर, सीडीपीओ आशंका गावकर, आरोग्य अधिकारी डॉ. जुझे तावारिस आदी उपस्थित होते.

डॉ. जुझे तावारिस यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे स्वागत केले. सर्व उपकेंद्रांत हा कार्यक्रम २ ऑक्टोबरपर्यंत चालणार असल्याचे आशंका गावकर यांनी सांगितले.

नगराध्यक्ष गावकर म्हणाले की, या योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या चाचण्या करण्यात येत असून याचा लाभ करून घेणे गरजेचे आहे. त्याकरता लोक जागृती झाली पाहिजे. या योजनेअंतर्गत इस्पितळातच वेगवेगळ्या गरजेच्या वस्तूंची दालने खुली केली होती. सूत्रसंचालन डॉ. दिवाकर वेळीप, तर डॉ. नीलिमा देसाई यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT