police service feedback Dainik Gomantak
गोवा

Police Service Feedback: पोलीस सेवेवरती समाधानी नाही आहात? मग स्कॅन करा QR Code; अभिप्राय नोंदवा थेट

QR code feedback system police: राज्यातील पोलिस सेवेवर नागरिक समाधानी नसतील तर त्‍यांना आता पोलिस ठाण्याच्या बाहेर प्रदर्शित क्यू आर कोड स्कॅन करून आपले म्हणणे नोंदविता येणार आहे.

Sameer Panditrao

State police service citizen satisfaction QR feedback system

पणजी: राज्यातील पोलिस सेवेवर नागरिक समाधानी नसतील तर त्‍यांना आता पोलिस ठाण्याच्या बाहेर प्रदर्शित क्यू आर कोड स्कॅन करून आपले म्हणणे नोंदविता येणार आहे. यापूर्वी पोलिस तक्रार प्राधिकरणाकडे नागरिक तक्रार करू शकत होते. मात्र, प्रत्येकजण तो मार्ग अवलंबत असे, असे नाही.

पोलिस सेवेत सुधारणा करण्यासाठी नागरिकांचे म्हणणे महत्त्वाचे मानले जाणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, प्रत्येक पोलिस ठाण्याबाहेर पोलिस अभिप्राय क्यू आर कोड लावले जातील. ज्‍यामुळे नागरिकांना पोलिस सेवेविषयी थेट आपला अभिप्राय देण्याची सुविधा मिळेल. हा अभिप्राय पोलिस मुख्यालयातून तपासला जाईल. ज्यामुळे पोलिसांकडून जनतेला दिल्या जाणाऱ्या सेवेत सतत सुधारणा घडवून आणता येतील आणि आवश्यक ती कारवाई करता येईल.

केंद्र सरकारने स्थापन केलेल्या ‘भाषिनी ॲप’द्वारे एआयचलित भाषा अनुवाद व्यासपीठ गोव्यातही लागू करण्याची व नागरिकांना पोलिसांसोबतच्या त्यांच्या अनुभवांवर रिअल टाईम फिडबॅक देण्यासाठी क्यूआर कोड आधारित फिडबॅक यंत्रणांच्या उपक्रमांची घोषणा गोवा पोलिसांनी केली. या क्यूआर कोडमुळे नागरिकांना समस्याची तक्रार नोंदवण्यास मदत होणार आहे. सुमारे २६४८ पोलिस कर्मचाऱ्यांनी ‘भाषिनी ॲप’ डाऊनलोड करून घेतला. गोवा पोलिसांनी आल्तिनो येथे आयोजित केलेल्या पोलिस बढती कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. त्यावेळी या परिवर्तनात्मक उपक्रमांची घोषणा करण्यात आली.

या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी नावीन्यपूर्ण आणि नागरिक-केंद्रित कार्यपद्धतीसाठीच्या त्यांच्या वचनबद्धतेबद्दल गोवा पोलिसांचे कौतुक केले. हे उपक्रम विश्वास, उपक्रम वाढविण्यासाठी आणि अधिक सुरक्षित आणि नागरिक व पर्यटकांसाठी पारदर्शक वातावरण तयार करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. यावेळी पोलिस खात्यातील ११३ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. त्यामध्ये ४५ जणांना उपनिरीक्षकपदी, ४४ जणांना साहाय्यक उपनिरीक्षकपदी, २४ जणांना पोलिस हवालदारपदी बढती देण्यात आली.

...अशी असेल आधुनिक सुविधा

भाषिनी ॲप, एआयचलित भाषा अनुवाद व्यासपीठामुळे विविध भारतीय भाषा बोलणाऱ्या पर्यटकांशी प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांना मदत होणार आहे.

त्यामुळे भाषेतील अडथळे दूर होतील व अखंड संवाद सुनिश्चित करणे सोपे होणार आहे.

हे ॲप पोलिस नियंत्रण कक्ष, महामार्ग गस्तीवरील वाहने, पिंक फोर्समध्ये उपलब्ध असेल.

५४ एमडीटीवर हे ॲप आधीपासूनच स्थापित आहे.

क्यूआर कोड उपक्रम पोलिस स्टेशन, सूचना फलकांवर, इतर प्रवेशयोग्य ठिकाणी आणि गोवा पोलिसांच्या वेबसाईटवर ठळकपणे प्रदर्शित केला आहे.

नागरिकांना बोलते करणारी यंत्रणा

ही अभिप्राय यंत्रणा केंद्रीकृत डेटाबेसमध्ये संग्रहित सर्व अभिप्रायांसह नागरिकांना त्यांचे अनुभव वर्णन करण्यास, सूचना ऑफर करण्यास आणि समस्यांची तक्रार करण्यास सक्षम करणार आहे. फीडबॅकचे नियमित विश्लेषण केल्याने सुधारणा आवश्यक असलेले क्षेत्र ओळखण्यात आणि उच्च कामगिरी करणाऱ्या पोलिस ठाण्यांना ओळखण्यात मदत होईल. उपस्थित केलेल्या तक्रारी आणि समस्यांचे त्वरित निराकरण केले जाईल आणि जबाबदारी आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी फीडबॅक ट्रेंडवर नियमित अहवाल प्राप्त करतील, असे पोलिस महासंचालक अलोक कुमार म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT