वास्को येथील देशपांडे रोड, अन्नपुर्णा समोर अर्धवट स्थितित राहिलेले गटाराचे काम व त्यावरिल उखडलेल्या लाद्या. Dainik Gomantak
गोवा

मुरगाव नगरपालिकेच्या अर्धवटपणामुळे पार्किंग व्यवस्थेचे वाजले तीन-तेरा

पादचाऱ्यांनाही याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांत असंतोष पसरला आहे

दैनिक गोमन्तक

वास्को: शहरात गटार साफ व दुरुस्ती करण्याच्या नावाखाली उघडून टाकलेल्या गटारावर लाद्या परत गटारावर झाकल्या नसल्याने वाहतूक रहदारीचे तसेच पार्किंग व्यवस्थेचे तीन तेरा वाजत आहे. पादचाऱ्यांनाही याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांत असंतोष पसरला आहे.(Citizens had to suffer due to partial work of Mormugao Municipality)

वास्को येथील देशपांडे रोड, अन्नपुर्णा समोर अर्धवट स्थितित राहिलेले गटाराचे काम व त्यावरिल उखडलेल्या लाद्या.

मुरगाव नगरपालिकेतर्फे Mormugao Municipality शहरातील गटार साफ व दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. गेले दोन तीन महिन्यापासून सदर काम चालू आहे. आज पर्यंत काम अर्धवट आहे. दरम्यान या गटाला वरील लाद्या काढून टाकण्यात आले आहेत. काही लाद्याचा चुराडा झाला आहे. तर काही लाद्या तुटलेल्या आहेत. त्या तशाच रस्त्यावर पडून आहेत. येथील देशपांडे मार्गावर अन्नपूर्ण हॉटेल समोरील गटाराचे काम गेले तीन महिने चालू असून अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे येथील पार्किंग Parking व्यवस्थेचा बोजवारा झाला आहे. तसेच शहरात इतर ठिकाणी गटारा वरील लाद्या उखडलेल्या स्थितीत आहेत, मात्र त्या परत घालण्याचे नाव पालिका घेत नाही किंवा स्थानिक प्रतिनिधी घेत नाही. त्या तशाच पडून आहे. त्यामुळे याचा वाहतूक रहदारीवर परिणाम होतो. तसेच पादचारानाही याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. तेव्हा सदर गटाला वरील लाद्या लवकर घालाव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT