Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: रस्ता डांबरीकरणासाठी जांबोटीत नागरिकांचा एल्गार

बेळगाव - गोवा राज्य मार्गावर केले रास्ता रोको

दैनिक गोमन्तक

मान येथील रस्त्याची दुरुस्ती करावी, रस्त्याचे डांबरीकरण करावे या मागणीसाठी मान ता . खानापूर येथील ग्रामस्थांनी जांबोटी येथील बेळगाव - गोवा राज्य मार्गावर रास्ता रोको केला. यावेळी नागरिकांनी जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. गेली अनेक वर्षे सातत्याने मागणी करूनही प्रशासन मान गावच्या लोकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. यासाठी आंदोलनाचे हत्यार उगारत नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला.

(Citizens from man protest at Jamboti for road repair)

मान येथील 4 कि. मी. अंतर असणाऱ्या संपर्क रस्त्याच्या विकासासाठी निधी मंजूर केला आहे. तरी देखील वन खाते रस्त्याचे काम करू देत नसल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. चिखलात अडकलेली वाहने काढण्यासाठी दोरखंड लावून कसरत करावी लागत आहे.

रोजच्या या समस्येला कंटाळून ग्रामस्थांनी जांबोटी येथे रास्ता रोको करत आंदोलन छेडले. दुपारी 12 वाजता रस्त्यावर ठाण मांडून वाहतूक रोखण्यात आल्यानंतर या आंदोलनाची तहसीलदार प्रवीण जैन आणि पोलिस निरीक्षक सुरेश शिंगी नोंद घेतली व आंदोलक ग्रामस्थांची समजून काढण्याचा प्रयत्न केला.

तहसीलदार प्रवीण जैन आणि पोलिस निरीक्षक सुरेश शिंगी यांनी आंदोलनस्थळी भेट दिली यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी तहशीलदार व इतर अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी केली. या आंदोलनात मान येथील लहान मुले, महिला आणि वयोवृद्ध नागरिकांनी सहभाग नोंदवला.

भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना रस्त्यासारखी मूलभूत गरज पूर्ण करण्यात प्रशासन अपयशी ठरत असेल तर सर्वसामान्यांनी लोकशाहीवर कसा विश्वास ठेवावा. असा प्रश्न मानवासियांनी उपस्थित केला. तसेच रस्त्याचा प्रश्न त्वरित मार्गी न लागल्यास भविष्यातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT