Mopa Airport Goa Dainik Gomantak
गोवा

E-Cigarette at Goa Airport : सॉक्सच्या आत ई-सिगारेट लपवून नेणाऱ्या रशियन नागरिकाला मोपा विमानतळावर अटक

Russian national found carrying e-cigarette at Goa airport; case filed: भारतात ई-सिगारेटच्या वापरावर बंदी आहे आणि तरीही अवैध प्रकारे ही सिगरेट आढळून आल्याने रशियन नागरिक पोलिसांच्या हाती लागला.

Akshata Chhatre

Mopa Airport: मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळावरून एक धक्कादायक प्रकरणाचा खुलासा झाला. बुधवार (दि. २७ नोव्हेंबर) रोजी वैध कागदपत्रांशिवाय ई-सिगारेट बाळगल्याबद्दल मोपा विमानतळ पोलिसांनी एका रशियन नागरिकावर गुन्हा दाखल केला. भारतात सप्टेंबर २०१९ असून ई-सिगारेटच्या वापरावर बंदी आहे आणि तरीही अवैध प्रकारे ही सिगरेट आढळून आल्याने रशियन नागरिक पोलिसांच्या हाती लागला.

मिळालेल्या माहितीनुसार उत्तर गोव्यातील मोपा विमानतळावरील सीएसएफ युनिटचे एसआय राजेश मांझी यांनी ही तक्रार दाखल केली होती.विमानतळावर तपासणीदरम्यान इरोशकिन अलेक्सेईला ई-सिगारेट आढळून आली.

रशियातील नागरिकाने त्याच्या उजव्या पायाच्या सॉक्समध्ये ही ई-सिगारेट लपवलेली होती.हा प्रवासी पोलिसांच्या हाती लागताच भारतात ई-सिगारेटवर बंदी असल्याने प्रवाशाकडून शुल्क आकारले गेले.

मोपावरील मद्यविक्रीस स्थानिकांचा विरोध

गोवा सरकारने इमारतीच्या टर्मिनलमध्ये मद्यदालन सुरू करण्यास ‘एएआय’ला परवानगी दिली होती. त्यानुसारऑनलाईन निविदा जारी केली होती व त्यावर लिलाव झाला होता. या लिलावात मुंबई वाईन्स अँड ट्रेड्स कंपनी यशस्वी ठरली. या दरम्यान राज्यातील मद्य व्यवसाय मालक संघटनेने याचा जाब सरकारला विचारला होता, मात्र सरकारने त्याला काहीच उत्तर दिले नव्हते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT