churchome Power Issue engineer assurance electricity transformer Dainik Gomantak
गोवा

Churchome Power Issue : कुडतरीतील वीज ट्रान्स्फॉर्मर बदलणार; अभियंत्याचे आश्‍वासन

अभियंत्याचे आश्‍वासन : कणसांचे फेस्तापूर्वी पथदीपांची दुरुस्ती

गोमन्तक डिजिटल टीम

Madgaon : कुडतरी मतदारसंघांत वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन वीज समस्या सोडविण्यासाठी अधिक क्षमतेचे विजेचे ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचे आश्वासन वीज अभियंत्यांनी दिले. कुडतरीचे भाजप नेते अँथनी बार्बोझा यांनी कुडतरीच्या नागरिकांबरोबर आज वीज कार्यालयात जाऊन विजेच्या समस्या अभियंत्यांकडे मांडल्या.

यावेली राय येथील कणसांचे फेस्ताच्या ‘नोव्हेना’ सुरू होण्यापूर्वी पथदीप दुरुस्ती करणार असल्याचेही अभियंत्यांनी आश्वासन दिले. मानोरा, बाकभाट, आर्लेम, विराभट- कुडतरी, भाटी-कुडतरी आणि इतर अनेक ठिकाणी विद्यमान ट्रान्सफॉर्मर बदलून तिथे उच्च शक्तीचे ट्रान्सफॉर्मर बसविण्याची गरज बार्बोझा यांनी व्यक्त केली.

अभियंता सूरज वाघमोडे आणि कैलास नाईक गावकर यांनी सर्व तक्रारी ऐकून घेतल्या. झेवियर फर्नांडिस, मिंगेलिना डिसोझा, राणी डिकुन्हा, मन्युएल रॉड्रिग्ज, ज्योती नाईक, दया मिंगळे, तारकेश्वर नाईक, क्लेमेंत डायस व अन्य नागरिक उपस्थित होते.

राया आणि कुरतरी, मानोरा, बरेभट्ट, आर्लेम, कुर्रा, टेंबी-उज्रो, गन्नापोगा, डॅमन, क्वेव्हॉन, बाकभट्ट, कोलमडोंगोर, सांतेमोल आणि परिसरातील पथदीप सुरळीत करण्यासाठी वीज संबंधित सर्व तक्रारींचे निराकरण करण्याची मागणी बार्बोझा यांनी यावेळी केली.

समस्या सोडविणार!

अभियंत्यांना 5 ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या राय येथील पारंपरिक मेजवानी ''कॉन्समचेम फेस्त''च्या नोव्हेनास सुरू होण्यापूर्वी सर्व समस्या सोडविणे आवश्‍यक असल्याचे अवर लेडी ऑफ स्नोज चर्चच्या झेवियर फर्नांडिस यांनीही सांगितले.

तसेच राय जंक्शन आणि सँटेमॉल जंक्शन येथे योग्य पथदीप दुरुस्तीची मागणी करण्यात आली. त्यावर राय फेस्त नोव्हेना सुरू होण्यापूर्वीच पथदीपही सुरू होतील, तसेच इतर समस्याही सोडविल्या जातील, असे विद्युत सहाय्यक अभियंता सूरज वाघमोडे, कनिष्ठ अभियंता कैलास नाईक गावकर यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT