Churchill Alemao Dainik Gomantak
गोवा

Churchill Alemao: "...अन् तेव्हाच रोमी कोकणीला राजभाषेचा दर्जा मिळाला असता," आलेमाव यांनी स्पष्टच सांगितलं

Romi Konkani Language: राज्यात मागील काही दिवसांपासून रोमी कोकणीला राजभाषेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.

Manish Jadhav

राज्यात मागील काही दिवसांपासून रोमी कोकणीला राजभाषेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. विशेष म्हणजे, यासंबंधी दोन आठवड्यांपूर्वी आंदोलन करण्यात आले होते. याचदरम्यान आता, रोमी कोकणीला राजभाषेचा दर्जा मिळाल्यास मला आनंदच होईल. रोमी कोकणीसाठी आंदोलन करणाऱ्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. कोकणी चळवळीसाठी आपण लढा दिला परंतु उदय भेंब्रे यांनी खोडा घातल्याने रोमी बाजूला राहिली. त्यामुळे देवनागरी कोकणीला राजभाषेचा दर्जा मिळाला असे गोव्याचे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव म्हणाले.

दरम्यान, वार्का येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना आलेमाव यांनी रोमी कोकणीला आपला पाठिंबा असल्याचे सांगितले. यावेळी कोकणी चळवळीत आपला सक्रीय सहभाग होता हे सांगायला ते विसरले नाहीत. त्यावेळी तत्कालीन राज्य सरकारने शूट अॅड साईटचा आदेश काढल्याने महिनाभर भूमिगत झालो होतो. आता कोकणी चळवळीतील अनुभवावर पुस्तक लिखाण करत आहे, ते येत्या काही दिवसांत प्रकाशित होईल, असेही ते म्हणाले.

आलेमाव पुढे म्हणाले की, ''कोकणी चळवळीत मी राधाराव ग्रॅसिअस यांच्यासोबत सहभागी झालो होतो. चळवळीदरम्यान मी रोमी कोकणीला राजभाषेचा दर्जा देण्याची मागणी केली होती. पण उदय भेंब्रे यंनी खोडा घातला. त्यांनी हा खोडा घातला नसता तर रोमी कोकणीला त्यावेळीच दर्जा मिळाला असता. त्यामुळे इंग्रजीची गरज भासली नसती. माझे पुस्तकही रोमी कोकणीमधूनच येत आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT